गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर

By Admin | Updated: May 2, 2017 23:45 IST2017-05-02T23:45:09+5:302017-05-02T23:45:09+5:30

तळणी- बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत.

A landmark of rights for pregnant women | गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर

गरोदर महिलांसाठी हक्काचे माहेरघर

तळणी : शासनाकडून ग्रामीण भागातील गरोदर महिलांसाठी आरोग्यसंदर्भात विविध योजना राबविल्या जातात; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या योजनांना लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही; मात्र कोठल्याही शासकीय योजनेतून लाभ मिळण्याची प्रतीक्षा न करता बुलडाणा तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीने गावातील महिलांसाठी हक्काचे माहेरघर सुरू केले आहे. यातून गरोदर महिलांना विविध सुविधा ग्रामपंचायतीकडून देण्यात येत आहेत.
बऱ्याचवेळा शासकीय योजनांमधून आजारपण असो वा बाळंतपण ग्रामीण महिलांना योग्य तो उपचार आणि सुविधा वेळेवर मिळत नाही. आर्थिक तसेच वैद्यकीय साधनांच्या अभावामुळे अनेकदा गरोदर महिलांना योग्य उपचार उपलब्ध होत नाही. त्यामुळे आई आणि बाळ या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. अशा गरोदर महिलांना सुविधा मिळावी, या उद्देशाने तळणी येथे ग्रामपंचायतने गरजू व गरोदर महिलांना हक्काचे माहेरघर उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील महिलांना बाळंतपणात कुठलीही अडचण येऊ नये, त्यांची व नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी तसेच निगा राखली जावी, वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या तसेच सल्ला उपलब्ध व्हावा, यासाठी माहेरघराची निर्मिती करण्यात आली. या माहेरघरात गरोदर महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच पलंग तसेच कूलरची व्यवस्था करण्यात आली. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच आशा विठ्ठल नारखेडे यांनी केले आहे. आय.एस.ओ.मानांकन प्रमाणपत्रसुद्धा तळणी ग्रामपंचायतला मिळाले आहे.

Web Title: A landmark of rights for pregnant women