शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव

By admin | Updated: October 27, 2014 22:48 IST

तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा : रेफर टू अकोला पध्दत सुरुच.

फहीम देशमुख/ शेगाव

         जागतिक बँक व तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अर्थसाहाय्याने मोठा खर्च करून शेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली. परंतु तज्ञ डॉक्टारांच्या अभावामुळे येथे उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्रीचा रुग्णांसाठी वापर करता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवेसाठी खासगी रुग्णालयात किंवा खामगाव, अकोला जाऊन आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचेच आरोग्य बिघडलेले दिसते. शेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे. शेगाव, संग्रामपूर, जळगाव व बाळापुर तालुक्यातील काही भागातील नागरीक या रुग्णालयावर अवलंबुन असुन दररोज किमान १00 रुग्ण दाखल होवून उपचार घेतात तर बाह्य रुग्ण विभागात १५0 च्या जवळ पास रुग्ण औषधोपचार घेतात. या भागात होणार्‍या अपघातातील जखमींवर याठिकाणी उ पचार करण्यात येतात. मात्र आता हे रुग्णालय फक्त नाममात्र राहिले असून तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा येथे जाणवत आहे. त्यामुळे गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उ पचारासाठी अकोला किंवा नागपूर येथील रुग्णालयात हलविले जाते. तसेच प्रसूतीसाठी दाखल होणार्‍या मातांची प्रसूती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटी डॉ क्टरांची सेवा दिली जाते. नॉर्मल होणार्‍या डिलेव्हरी पेशंटलाच या रुग्णालयात थांबविले जाते. रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला अकोला हलविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे ५0 किमी अंतर कापतांना रुग्णाचे मोठय़ा प्रमाणावर हाल होतात. तसेच जोखीम सुध्दा प त्करावी लागते.