बाजार समितीमध्ये ट्रकच्या धडकेत मजूर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:04 IST2020-10-23T15:04:51+5:302020-10-23T15:04:59+5:30

Khamgaon, Accident एका मजुरास ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

A laborer was killed on the spot in a truck collision in the Khamgaon market committee | बाजार समितीमध्ये ट्रकच्या धडकेत मजूर जागीच ठार

बाजार समितीमध्ये ट्रकच्या धडकेत मजूर जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका मजुरास ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी रात्री माल भरण्यासाठी आलेल्या ट्रक क्रमांक एमएच -२८ जे बी ८२३८ ने त्या ठिकाणी काम करणाऱ्या शामराव पांडुरंग इंगळे (५५) रा. दाळफैल या मजुरास घडक दिली. 
या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक ताब्यात घेतला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चालकाकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय इश्वर सोळंके हे करीत आहेत. शामराव इंगळे या मजुराचा अपघातात मृत्यू झाल्याने बाजार समितीतील सर्व हमाल, मापारी संघटनेने गुरूवारी बंद पाळला.

Web Title: A laborer was killed on the spot in a truck collision in the Khamgaon market committee