शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टा जाणीव जागृती अभियान

By admin | Updated: August 19, 2014 22:40 IST

२१ ऑगस्टपासून खारपाणपट्टा विशेष जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात खारपाणपट्टयाखाली १६0 गावे आहेत. तेथे लोकांमध्ये मुतखड्याचे प्रमाणे जास्त आढळते. खार्‍या पाण्यामुळे होणार्‍या आजारांना लोक बळी पडू नयेत यासाठी २१ ऑगस्टपासून खारपाणपट्टा विशेष जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात मेळाव्याने होणार आहे. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महादेव माळी हे लाभणार आहेत. मेळावा गुरूवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता भगीरथ मंगल कार्यालय, खामगाव रोड, एचडीएफसी बँकेच्या बाजूला शेगाव येथे होणार आहे. सदर मेळाव्यासाठी या १६0 गावातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. या अभियानाचे आयोजक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विलास पुजारी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जी.एस.घाईट, संदीप सुखधान, शरद ठाकूर, ज्ञानेश्‍वर वाकोडे, संतोष साखरे, समीर बेग, संदीप पाटील, सचिन जाधव, ङ्म्रीमती मनिषा शेजव, ङ्म्रीमती प्रणिता अंभोरे, किरण शेजोळे, सागर कल्याणकर यांनी केले.