शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांना मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: July 15, 2015 01:20 IST

चिखली तालुक्यातील खरीप पिकांना मिळाले खडकपूर्णाचे पाणी

चिखली (जि. बुलडाणा): जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात असून, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र आहे; मात्र शेतकर्‍यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी ऐनवेळी कालव्यात सोडल्या गेल्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांची पिके वाचविण्यात यश आले आहे.खरिपाच्या पेरणीपूर्वीच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही निसर्गाने अवकृपा केल्यास खरीप हंगामात किमान दोन वेळा पाणी देण्याची वेळ आल्यास शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी खरीप हंगामाकरिता राखीव ठेवून खरीप हंगाम आवर्तन कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी, अशी मागणी पांटबंधारे विभागाकडे केली होती. दरम्यान, तालुक्यात पेरणीपश्‍चात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढावणार, याची बहुदा जाणीव असलेल्या भारत बोंद्रे यांनी गत महिन्यात पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीचा तातडीने पाठपुरावा केल्यामुळे जलसंपदा विभागाने खकडपूर्णा प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्याचा निर्णय घेऊन ९ जुलैपासून कालव्यात पाणी सोडल्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे तीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत झाली असून, भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.