शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी खामगाववरून तूर परत!

By admin | Updated: May 1, 2017 00:31 IST

मेहकर- मेहकर येथील तूर खामगावला पाठविली होती; परंतु खामगाव येथेही जागा उपलब्ध नसल्याने सदर तूर परत मेहकरला आणली आहे.

तुरीचे मोजमाप, खरेदी बंद : तूर उत्पादक शेतकरी त्रस्त मेहकर : नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने, तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तुरीचे मोजमाप व खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, मेहकर येथील तूर खामगावला पाठविली होती; परंतु खामगाव येथेही जागा उपलब्ध नसल्याने सदर तूर परत मेहकरला आणली आहे. पुढील आठवड्यात तुरीचे मोजमाप व खरेदीला सुरुवात होणार असल्याचे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले.मेहकर तालुक्यात हजारो क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे; परंतु बाजारात तुरीला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने नाफेड अंतर्गत तूर खेरदीचे केंद्र सुरू करून हमी भावात तूर खरेदी सुरू केली होती. परंतु, बारदाना नसणे, खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी मेहकरमध्ये जागा नसणे, या कारणावरुन गेल्या काही दिवसांपासून तुरीचे मोजमाप व खरेदी बंद आहे. शासनाने शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु केली होती. परंतु तुरीची आवक वाढल्याने बारदाना व जागेअभावी हे खरेदी केंद्र बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. मेहकर तालुक्यात अजूनही जवळपास १९ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप लवकरात लवकर व्हावे व शेतकऱ्यांना पैसे मिळावे, यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.शेतकऱ्यांना तत्काळ पैसे द्या - जाधवशासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तूर खरेदी केंद्र सुरु केले असले, तरी बारदाना व जागा नसल्याने हे खरेदी केंद्र बंद अवस्थेत आहे. हजारो क्विंटल तुरीचे मोजमाप अजून बाकी आहे. जोपर्यंत तुरीचे मोजमाप होऊन तूर गोडावूनला साठविण्यात येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. नोटाबंदी, मुलींचे लग्न, बँकांकडून घेतलेले कर्ज हे सर्व व्यवहार ठप्प झाले. तरी तुरीचे मोजमाप करा व शेतकऱ्यांना पैसे द्या, अशी मागणी कृउबास सभापती माधवराव जाधव यांनी केली.मार्केट यार्डात तूर पडूननाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी मेहकर येथे जागा नसल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी तुरीच्या पाच गाड्या खामगावला पाठविल्या होत्या. मात्र तेथेही जागा नसल्याने ह्या गाड्या परत आल्या. ही तूर मार्केट यार्डात उघड्यावर पडून आहे.अधिकाऱ्यांची बैठकनाफेडची तूर खरेदी केंद्र बंद असून, त्यामुळे तुरीचे मोजमाप लवकर व्हावे, तसेच मोजमाज करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी १ मे रोजी तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले.तुरीचे मोजमाप लवकर होईल - काकडेनाफेड केंद्रामार्फत तुरीची खरेदी सुरु आहे; परंतु तुरीची आवक वाढल्याने बारदाना व जागा कमी पडत असल्याने सध्या तुरीचे मोजमाप बंद असले, तर खामगाव अथवा इतर ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. २ ते ३ दिवसांत मेहकर येथील तूर उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, वरिष्ठांशी तसे बोलणे झाले आहे. एकाही शेतकऱ्यांची तूर मोजमाप केल्याशिवाय राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊन लवकरात लवकर तूर मोजमाप सुरु करण्यात येईल, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले आहे.