खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 13:57 IST2019-09-13T13:57:00+5:302019-09-13T13:57:05+5:30

योगेश चव्हाण (३६) मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते.

Khamgaon Municipality employee commits suicide | खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वा. उघडकीस आली. 

योगेश चव्हाण (३६)  मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर  कार्यरत होते. मात्र गत साडेतीन महिन्यापासून ते आपल्या कर्तव्यावर अनुपस्थित होते. पालिकेतिल अनुपस्थितीच्या काळात ते खासगी क्लीनिक चालवित असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गत एक_-दोन दिवसापूर्वी त्यानी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला असावा, अशी शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.  त्यानी आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.  घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Khamgaon Municipality employee commits suicide