शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव व खामगाव एस.टी.आगाराची शटल सेवा

By admin | Updated: April 17, 2017 00:40 IST

अवैध प्रवासी वाहतुकीला रोखण्यासाठी एस.टी.महामंडळाचा उपक्रम

जयदेव वानखडे - जळगाव जामोददिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध खासगी प्रवासी वाहतूक एस.टी. महामंडळासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर वारंवार उपाय शोधून नियम बनवूनही एसटी आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात लगाम लावू शकली नाही. त्यासाठी एसटी महामंडळ राबवित असलेल्या शटल सेवेचा शुभारंभ १५ एप्रिलपासून जळगाव जामोद व खामगाव आगाराने केला आहे. या उपक्रमामुळे प्रवासी निश्चितच एसटीकडे वळतील आणि अवैध खासगी वाहतुकीला लगाम लागेल, अशी शक्यता आहे.या शटल सेवा उपक्रमांतर्गत दररोज जळगाव जामोद आगारामधून दर अर्ध्यातासाचे फरकाने सकाळी पहिली बस ७ वाजता, दुसरी बस ७.३० वाजता आणि तिसरी बस ८ वाजता, अशा ३ बसगाड्या सोडण्यात येतील. प्रत्येक बस दिवसभरात चार फेऱ्या पूर्ण करेल, अशा पद्धतीने ३ बसेस दिवसभर १२ फेऱ्या खामगावकरिता पूर्ण करेल. याचप्रमाणे दुसरीकडे खामगाव आगारामधून खामगाव आगाराच्या तीन एसटी बसेस सकाळी ७ वाजता, दुसरी बस ७.३० वाजता आणि तिसरी एसटीबस ९ वाजता जळगाव जामोदकरिता सुटणार आहे. दर अर्ध्या तासाच्या फरकाने ह्या बसेस सुद्धा दिवसभरात १२ फेऱ्या जळगावकरिता पूर्ण करणार आहे. एकंदर दिवसभरात जळगाव जामोद आगाराच्या १२ आणि खामगाव आगाराच्या १२, अशा एकूण २४ बसफेऱ्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निश्चितच प्रवाशांना थांबावे लागणार नाही.प्रवाशांचा वेळही वाया जाणार नाही आणि पैसेसुद्धा वाचतील. म्हणूनच शटल सेवा दोन्ही आगाराचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल आणि अवैध खासगी प्रवासी वाहतुकीलाही लगाम लागेल, असा विश्वास एसटी महामंडळाला आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्या, लग्नसराईची धामधूम पाहता एसटीची शटल सेवा ही प्रवासी वर्गासाठी महत्त्वाची ठरेल.बस थांबली नाही, तर तक्रार करा!शटल सेवा उपक्रम अंतर्गत २४ फेऱ्या करणाऱ्या बसेस जळगाव ते खामगाव दरम्यान सर्व बसथांब्यावर थांबतील आणि जर ही बस कोणत्याही बसथांब्यावर थांबली नाही, तर खामगाव आगारप्रमुख एस.एम. वानेरे, बसस्थानक प्रमुख व्ही.ए. दलाल, जळगाव जमाोद आगारप्रमुख पी.पी.शिंदे , जळगाव बसस्थानक प्रमुख वांदे यांच्याकडे तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले. खामगाव ते मेहकर शटल सेवा उपक्रमास प्रारंभखामगाव अगाराच्यावतीने मेहकरकरिता याप्रमाणे शटल सेवा प्रारंभ १५ एप्रिल रोजी करण्यात आला. या अंतर्गत खामगाव आगारामधून ४ एसटी बस गाड्या सकाळी ६ नंतर दर अर्ध्या तासाच्या फरकाने सोडण्यात येतील तर दुपारी जाणाऱ्या नाईट आऊटच्या बसेस ह्या ४ ही गाड्या मेहकर मुक्कामी राहतील. व दुसऱ्या दिवशी सकाळी परत ठरल्या शेड्युलप्रमाणे ह्या एस.टी.बसेस प्रवाशांकरिता उपलब्ध राहतील. याचप्रमाणे मेहकर आगारामधून सुद्धा अशीच सेवा १७ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक वानेरे यांनी दिली. यामुळे दोन्ही आगाराच्या बसेस दिवसभरात २४ फेऱ्या करतील त्यामुळे निश्चीतच लग्नसराईच्या धामधुमीत प्रवाशांकरिता सुविधा एस.टी.महामंडळाने करुन दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी जिवघेणी अवैध खासगी प्रवासी वाहतूक टाळून एस.टी.चा सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन आगारप्रमुख शिंदे, वनारे यांनी केले आहे.