शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देयके सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 14:00 IST

आता वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर देयके मुख्याध्यापकांनाच सादर करावी लागणार आहेत.

 - योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वेतन व इतर पुरक देयके वेतन पथक अधिक्षक कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील सहाय्यक शिक्षकांकडून देयके दाखल करण्याचे प्रमाण वाढले होते. काही अपवादात्मक परिस्थितीत त्यांना देयके सादर करायची असल्यास त्याकरीता मुख्याध्यापकांची परवानगी आवश्यक असल्याचे निर्देश वेतन पथक अधिक्षकांनी १७ आॅक्टोबर रोजी दिले आहेत.जिल्ह्यात ३९८ खासगी अनुदानित शाळा आहेत. या सर्व शाळांना दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या वेतन अधीक्षक कार्यालयात वेतन व विविध देयके सादर करावी लागतात. ही जबाबदारी प्रामुख्याने मुख्याध्यापकांची असली तरी आतापर्यंत काही ठिकाणी सहाय्यक शिक्षक देयके कार्यालयात जमा करीत होते. परंतु आता वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर देयके मुख्याध्यापकांनाच सादर करावी लागणार आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव सहाय्यक शिक्षक हे वेतन देयके सादर करीत असतील तर त्यांना देयके सादर करण्याबाबत मुख्याध्यापकांनी प्राधिकृत केल्याचे पत्र वेतन देयकासोबत जोडणे गरजेचे आहे. सर्व देयकांवर वेतन पथक अधिक्षकांची स्वाक्षरी घेऊन वेतन पथक कार्यालयामध्ये देयक आवक करावे. मुख्याध्यापकांनी वेतन पथक अधिक्षकांची स्वाक्षरी घेतली नाही, तर ती देयके मान्य केल्या जाणार नाहीत.वेतन पथक अधिक्षक कार्यालयामध्ये अभ्यागत नोंदवही ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये नोंदी वेतन पथक सादर करताना नोंद करण्याबात सूचित करण्यात आले आहे. इतर शिक्षक वर्ग विनाकारण या कार्यालयामध्ये येत असल्यास ही बाब मुख्याध्यापकांना किंवा वेळप्रसंगी संबंधित संस्थेचे अध्यक्ष, सचिव व व्यवस्थापन मंडळाला याबाबत माहिती देण्यात येईल. नियमांचे पालन करणे सर्व खासगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना बंधनकारक राहणार असल्याचे पत्र वेतन पथक अधिक्षकांनी खासगी अनुदानित शाळांना दिले आहेत.

मुख्याध्यापकांनी स्वत: सर्व प्रकारची देयके वेतन पथक अधिक्षक कार्यालयात सादर करावी. काही अडचण असल्यास सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यास तसे संमतीपत्र द्यावे.-मनवर,वेतन पथक अधिक्षक

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक