शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘आयात’ उमेदवारांना लागणार लॉटरी

By admin | Updated: September 27, 2014 00:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागत असून, इतर पक्षातील आयात उमेदवारांवर त्यांची भिस्त आहे.

बुलडाणा : युती आणि आघाडीच्या घटस्फोटानंतर यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांचा उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तोडीसतोड उमेदवार देण्याकरता व्यूहरचना केली जात असून, इतर पक्षातील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागत असून, इतर पक्षातील आयात उमेदवारांवर त्यांची भिस्त आहे. आज रात्री उशिरापर्यंत या दोन्ही पक्षा तील उमेदवार ठरतील व हे उमेदवार मतदारसंघात नवे राजकीय धक्के देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आज दिवसभर जिल्ह्यात अफवांचा बाजार चांगलाच गरम होता. भाजपाने आतापर्यंत निवडणूक न लढविलेल्या मतदारसंघासाठी उमेदवार शोधत असून, सिंदखेडराजा किंवा बुलडाणा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतील एका दिग्गज नेत्याच्या नावाची चर्चा जोरात होती. या चर्चेमुळे भाजपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठेही पुष्टी करण्यात आली नाही. मेहकर म तदारसंघातही भाजपाला उमेदवाराचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारांची आयात केली जाणार असल्याचे संकेत आहेत. बुलडाणा, चि खली, मलकापूर या मतदारसंघासाठी प्रामुख्याने मोठे नेत्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीची यादी बाहेर आली नव्हती व त्या नेत्यांनाही काही निरोप न आल्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.शिवसेना खामगाव व जळगावमध्ये उमेदवारांची चाचपणी करीत असून, या दोन्ही ठिकाणी उमेदवार आयात करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. खामगावात भाजपा व सेना विशेषत: भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत सेना नेत्यांचा असलेला घरोबा पाहता सेनेकडून उमेदवार कोण, याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघात लागुन आहे.चिखली मतदारसंघात भाजपाच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे. येथे सेनेच्यावतीने डॉ.प्र तापसिंग राजपूत व जालींधर बुधवत यांनी अर्ज दाखल केला असून, यांच्यापैकी कुणाला अधिकृत उमेदवारी घोषित होते, यावरच जातीय समीकरणांचे राजकारण तापणार आहे. सिंदखेडराजा म तदारसंघात आज राष्ट्रवादीकडून रेखाताई खेडेकर यांनी अर्ज दाखल केला असला तरी राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ.राजेंद्र शिंगणो यांची अर्ज भरण्यावेळी असलेली अनुपस्थिती राजकीय क्षेत्रात चर्चेची झाली आहे. या सर्व मतदारसंघामध्ये आज अफवा फिरत होत्या. रात्री उशिरापर्यंत भाजपा, सेना व राष्ट्रवादीची यादी उमेदवार जाहीर झाल्यावरच मतदारसंघातील धक्क्यांची तीव्रता स्पष्ट होणार आहे.