देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त

By Admin | Updated: May 1, 2017 00:54 IST2017-05-01T00:54:44+5:302017-05-01T00:54:44+5:30

देऊळगाव राजा- राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा पथकाने इंडिका कारमधून दारूच्या २४0 बाटल्यांसह पावणे दोन लाखाचा माल व राजकुमार मान्टे नामक कार चालकास अटक केली.

Illegal liquor seized at Deulgaon Raja | देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त

देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त

देऊळगाव राजा : देशी दारूची कारमधून वाहतूक करीत असताना मिळालेल्या माहितीवरून कारची तपासणी केली असता देशी दारूचे बॉक्स आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा येथील पथकाने एकाला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. सदर घटना रविवारी दुपारी घडली.
देऊळगाव राजा ते चिखली रोडवर सिनगाव जहाँगीर फाट्यानजीक जिल्हा भरारी पथकाचे सुरेश चव्हाण दु.नि. सहकारी विशालसिंग पाटील, रामेश्वर सौभागे, अमोल अवचार, अमोल सुसरे, सोनाली उबरहंडे यांनी अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचला होता. वाहनांची तपासणी करत असताना टाटा कंपनीची इंडिका एम.एच.१४ ए.एन.४४९९ यामध्ये मागच्या सिटवर देशी दारूचे पाच बॉक्स २४० बाटल्या व आरोपी राजकुमार सुभाष मान्टे रा.देऊळगाव राजा याला कारसह पकडून त्याच्याकडून १ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त केला व आरोपीला न्यायालयात हजर केले, असा उल्लेख दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण यांनी वर्तमानपत्रांना प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटमध्ये केला आहे. प्रत्यक्षात जिल्हा भरारी पथकाने केलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर घटनास्थळ हे रोडपासून काही मीटर अंतरावर असलेली गोशाळा आहे. देशी दारूच्या बॉक्सची संख्या खूप मोठी आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले पण पुढे काय झाले, याचा उल्लेखही प्रेसनोटमध्ये नाही. कारवाईबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येऊन सायंकाळी पत्रकारांच्या दबावानंतर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बुलडाणा यांनी प्रेसनोट प्रसिद्धीसाठी काढली.

Web Title: Illegal liquor seized at Deulgaon Raja