शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह प्रवेशही ऑनलाईन

By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST

बुलडाणा जिल्ह्यातील १३ वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रवेश

बुलडाणा : राज्य शासनाच्या अनुदानीत व शासकिय मुला-मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया यावर्षी पासुन ह्यऑनलाईनह्ण करण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याला कोठल्याही वसतिगृहात आता प्रवेश घेता येईल. शासनाच्या या प्रकियेत जिल्ह्यातील १३वसतिगृहे सहभागी होणार असून विद्यार्थ्यांनाही लाभ घेत येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी त्याचप्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींना शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत बहुतांश तालुका व जिल्हा मुख्यालयी वसतिगृह सुरूकरण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर शासकिय मुला-मुलींचे वसतिगृह अशा या वसतिगृहाचे नाव आहे. राज्यभरात मुलांसाठी २११ तर मुलींसाठी १६३ असे एकूण ३७४ वसतिगृह सुरू आहेत. मोफत निवास व भोजन तसेच आंथरून-पांघरून, शालेय साहीत्य आणि वाचनालयाची व्यवस्था असलेल्या या वसतिगृहात राज्यभरातील जवळपास ३२ हजार ८७0 विद्यार्थी आपले शिक्षण पुर्ण करीत आहेत. गुणवत्तेनुसार या वसतिगृहामध्ये विविध जाती घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याठिकाणी प्रवेश घेण्याकरिता मुला-मुलींना यापूर्वी हेलपाटे घ्यावे लागत होते. परंतु यावषीर्पासून वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यिासाठी समाजकल्याण विभागाने स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. इयत्ता सातवी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा. ही ऑनलाईन प्रक्रिया यावर्षी पासूनच सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याकडून चूका होऊ नये म्हणून संबंधीत अर्जाची कॉपी आवश्यक कागदपत्रासह वसतिगृह अधिक्षकाकडे सादर करावयाची आहे. राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्याला याचा लाभ व्हावा, यासाठी समाजकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.