पाडळी येथे महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:44+5:302021-02-05T08:36:44+5:30

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी स्मारक निधीच्या वतीने प्रा.संतोष आंबेकर, नरेंद्र लांजेवार, ॲड.जयसिंगराव देशमुख, सुनील सपकाळ, ॲड.गणेशसिंग मोरे, रवींद्र ...

Greetings to Mahatma Gandhi at Padli | पाडळी येथे महात्मा गांधींना अभिवादन

पाडळी येथे महात्मा गांधींना अभिवादन

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी स्मारक निधीच्या वतीने प्रा.संतोष आंबेकर, नरेंद्र लांजेवार, ॲड.जयसिंगराव देशमुख, सुनील सपकाळ, ॲड.गणेशसिंग मोरे, रवींद्र पवार इत्यादींच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

आजच्या काळात महात्मा गांधींचे विचार अधिक प्रेरणादायी आहेत, याबाबत गांधीघर पाडळीचे व्यवस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.संतोष आंबेकर यांनी विचार व्यक्त केले. नरेंद्र लांजेवार यांनी गांधीजींचे विचार जगात जोपर्यंत हिंसा आहे, तोपर्यंत ते वंदनीय आणि स्वीकारले जाणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी यू.डी. मनवर, व्ही.बी. साबळे ए.डी. सावळे, आर.बी. बागडे, रवींद्र पवार, गायकवाड, सतीश हिवाळे पुरुषोत्तम कड इत्यादींसह गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

Web Title: Greetings to Mahatma Gandhi at Padli