सैलानी परिसरातून मुलगी बेपत्ता

By Admin | Updated: March 22, 2017 01:47 IST2017-03-22T01:47:32+5:302017-03-22T01:47:32+5:30

सैलानी बाबाच्या यात्रेत होळीच्या दिवशी १२ वर्षीय मुलगी सैलानी होळीच्या गर्दीतून बेपत्ता.

Girl missing from Sailani area | सैलानी परिसरातून मुलगी बेपत्ता

सैलानी परिसरातून मुलगी बेपत्ता

पिंपळगाव सैलानी(जि. बुलडाणा), दि. २१- सैलानी बाबाच्या यात्रेत होळीच्या दिवशी १२ वर्षीय मुलगी सैलानी होळीच्या गर्दीतून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीचे वडील कोडूबा विठ्ठल नवघरे रा. धानोर कवठा ता.कंधार जि.नांदेड यांनी रायपूर पोलीस स्टेशनला दिली
मुलीचे वडील व आई चांगुना नवघरे हे त्यांचा मुलगा व मुलगी सोबत घेऊन सैलानी यात्रेत आले होते. होळीच्या दिवशी मुलगी निहा कोडूबा नवघरे (१२ वर्ष) रंग सावळा अंगाला पंजाबी ड्रेस हातावर तिच्या व लहान भावाचे नाव विठ्ठल गोंधलेले, नाकात सोन्याची मोरणी, रंग काळा-सावळा असे वर्णन आहे. वडिलांच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Girl missing from Sailani area