शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्ज घ्या - कर्ज द्या’ आंदोलन

By admin | Updated: September 4, 2015 00:27 IST

खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा.

खामगाव : सलग तिसर्‍या वर्षी भयंकर दुष्काळ व नापिकीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना एकत्र करुन त्यांचे मनोधैर्य वाढावे व शासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर ह्यअर्ज द्या - कर्ज घ्याह्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. नापिकीमुळे शेतकर्‍यांवर कर्ज थकीत झाले आहे. त्यातच यावर्षी शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुटुंबीयांच्या आजारावर उपचार, मुलांचे शिक्षण यावर खर्च कोठून करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांच्या सह्या घेऊन मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता वाशिम जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मासूमशहा मस्तानशहा, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शाम अवथळे, प्रकाश पाटील, आर.,बी.देशमुख, गजानन पटोकार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी संजय सातव, ज्ञानदेव कराळे, शे.युनुस शे.युसुफ, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, आनंदा आटोळे, रणजीत देशमुख, संजय सातव, शे.कलंदर खान, अनिल चव्हाण, सोपान खंडारे या व इतर शेतकर्‍यांचा सहभाग होता. यावेळी तहसील कार्यालय परिसरात शेतकर्‍यांनी चांगलीच गर्दी केली.