जुगार खेळणारे चौघे अटकेत

By Admin | Updated: October 25, 2014 23:41 IST2014-10-25T23:41:45+5:302014-10-25T23:41:45+5:30

मातोळा तालुक्यातील घटना, पाच हजारांचा मुद्देमाल जप्त.

Four Gambling Attendants | जुगार खेळणारे चौघे अटकेत

जुगार खेळणारे चौघे अटकेत

मोताळा : जुगार खेळणार्‍या चौघांना धामणगाव बढे पोलिसांनी २४ आक्टोबर रोजी रोहिण खेड येथील पारपेट भागातून ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी धा. बढे पोस्टेचे पो.उप.नि. भोसले सोबत पो.काँ. शिवशंकर वायाळ हे पो. स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रोहिणखेड येथील गजानन महाराज मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी काही लोक एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाने खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पो. उप. नि. भोसले व पो.का. वायाळ यांनी छापा टाकून गजानन आकाराम परेराव (वय ३५), दामोधर जगन्नाथ गुजर (वय २५), अभय गजानन गुजर (वय २५) व गणेश निनाजी इंगळे (वय ३0) या चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून ५२ ताश पत्त्यासह नगदी २५७0 रुपये व मॅक्स, मायक्रोमॅक्स, नोकिया असे तीन मोबाईल किंमत तीन ३ हजार रुपये असा एकूण ५५७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त चौघांविरुद्ध मुंबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Four Gambling Attendants