शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील प्रथमोपचार पेटीला उपचाराची गरज

By admin | Updated: May 19, 2014 00:36 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार्‍या अनेक एसटीबसमधील प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.

मेहकर : राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार्‍या अनेक एसटीबसमधील प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. तर ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आलेल्या आहेत, त्यांचीही दुरवस्था असून, त्यातील औषधेही गायब आहेत. बसेसमधील अपघात कळस गाठत असल्याने एसटीतील प्रथमोपचार पेटीला आज उपचाराची गरज निर्माण झाली आहे. जनसामान्यांसाठी ह्यगाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटीह्ण ही ब्रिदावली घेऊन परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास अविरत सुरू आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एसटी बस; प्रवासासाठी गावागावांतील प्रवाशांची आजही एसटीवरच मदार आहे. एसटीला खासगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली, तरीही एसटीसारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांची आजही एसटीवरच ओढ आहे. एस.टी. चा प्रवास सर्वात सुखकर, त्यामुळे कितीही दुरवरचा प्रवास असेल तर प्रवासी एस.टी. बसला पसंती देतात. शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला जोडणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस सद्यस्थितीत राज्यभरातील रस्त्यांवर धावत आहेत. अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचारपेटी असते; मात्र एसटीमधील प्रथमोपचार पेटीकडे चालक, वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याने प्रथमोपचार पेटीलाच प्राथमिक उपचाराची गरज भासत आहे. काही एसटीबसची पाहणी केली असता बहुतांश एसटीबसमधील प्रथमोपचारपेटीच गायब असल्याचे आढळून आले. तर ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविलेली होती, त्या पेटीमध्ये औषधे किंवा प्राथमिक उपचाराचे कुठलेच साहित्य दिसून आले नाही. अपघात घडताच प्राथमिक उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपल्या प्राणालाही मुकावे लागते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटीतील प्रथमोपचाराचे तीनतेरा वाजत आहेत.