शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

By Admin | Updated: June 15, 2014 00:44 IST2014-06-15T00:41:36+5:302014-06-15T00:44:30+5:30

जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी १ जुलै रोजी वसंतराव नाईक प्रगतीशिल शेतकरी पुरस्काराचे वितरण करते.

Farmers invite proposals for the award | शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा : शेतीच्या विकासात नाविन्यपूर्ण काम करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान व्हावा, शेतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी १ जुलै रोजी वसंतराव नाईक प्रगतीशिल शेतकरी पुरस्काराचे वितरण करते. यावर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने १ जुलै रोजी हा कार्यक्रम मोठय़ा थाटात साजरा करण्यात येणार आहे.

या पुरस्काराची निवड करण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा संपन्न झाली. यावेळी कृषी विकास अधिकारी आर.एम.भराड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डी.व्ही.कोलते व सर्व कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभापती लक्ष्मी शेळके यांनी सांगितले की, शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणार्‍या शेतकर्‍यांचा खर्‍या अर्थाने या माध्यमातून सन्मान झाल्यास इतर शेतकर्‍यांनाही त्या माध्यमातून प्रोत्साहान मिळू शकते, असे सांगितले. कै. वसंतराव नाईक प्रगतीशिल शेतकरी पुरस्कार रु.११000 रोख व सन्मान पत्र तर राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशिल (महिला) पुरस्कारासाठी रु. ११000 रोख व सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील एका शेतकर्‍यास सन्मानपत्राने गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे प्रस्ताव ९ ते १६ जून पर्यंत पंचायत समिती स्तरावर दाखल करावयाचे आहेत. इच्छुक शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Farmers invite proposals for the award