शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणातील शेतकरी जखमी

By admin | Updated: May 31, 2017 20:12 IST

पळसखेड : वादळी पावसामुळे एक शेतकरी डोक्यात पाईप लागुन जखमी झाला आहे. मात्र तरीही उपोषणकत्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले असून,

लोकमत न्यूज नेटवर्कपळसखेड : शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी गावातील पंधरा ते विस शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा  ३१ मे रोजी दुसरा दिवस होता. दरम्यान वादळी पावसामुळे एक शेतकरी डोक्यात पाईप लागुन जखमी झाला आहे. मात्र तरीही उपोषणकत्यांनी आपले उपोषण  सुरुच ठेवले असून,अधिकारी जोपर्यंत शेतरस्ता मंजुर करत नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या उपोषण मंडपाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनिल तायडे, रसुलखान आदींनी भेटी देऊन चौकशी केली.  पाडळी येथील शेतकऱ्यांची पाडळी, गिरडा व चौथा शिवारात शेती आहे. यापुर्वी शेतात जाण्यासाठी नदी पात्राचा वापर करण्यात येत होता. परंतु या नदीत कोल्हापूरी बंधारे बांधण्यात आल्यामुळे तसेच नदीचे खोलीकरण झाल्या मुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैलगाडी नेण्यास अडचणी जात आहे. या बाबत महसुल प्रशासनाकडे जाऊनही मार्ग निघेनासा झाला आहे. त्यामुळे ऐन यंदाचा खरिपाच्या  हंगामावर शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला आहे. कारण पेरणी करण्याकरता जावयास  रस्ताच नसल्यामुळे शेतीची मशागत व पेरणी करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. तरी त्यामुळे तातडीने शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकरी समाधान डुकरे, प्रदिप डुकरे, अभिमन्यु डुकरे, शाम पवार, सिध्दार्थ जाधव, अनिल डुकरे, गजानन डुकरे, प्रशांत पवार, रामेश्वर काळे, शालीग्राम जाधव, तानाजी डुकरे, शिवाजी डुकरे, रामदास मुळे, सुनिल जाधव, संतोष जाधव, अशोक जुंबड व सुखदेव पवार या शेतकऱ्यांनी आज ३० मे पासून गट नंबर १७२ मधील शेतात उपोषणास सुरूवात केली आहे. दरम्यान शेतरस्त्यासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांपैकी रामदास विष्णाजी मुळे वय ६५ हे जखमी झाले आहेत. त्यांचेवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.