शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून रखडलेल्या घरकुलांचा हफ्ता मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:36 IST

Khamgaon News रखडलेली घरकुले आता फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेली घरकुले आता फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या १०० दिवसांच्या कालावधीत राज्यात `महा आवास अभियान (ग्रामीण)` राबवण्यात येत आहे. या अभियानात विविध घरकूल योजनांची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी उपक्रम राबवले जातील. सर्वांसाठी घरे-२०२२, या धोरणातून राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या गृहनिर्माण योजना तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच २०२०-२१ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ लाख ५ हजार ७७ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांमध्ये गृहनिर्माण क्षेत्राचा विकास या बाबीचाही समावेश आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी घरकूल बांधकामांचा वेग वाढवण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यानुसार गेल्या २०१७ पासून मंजूरी आणि बांधकामाला सुरूवात झालेल्या घरकुलांसह आतापर्यंत मंजूर सर्वच घरकुले फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न या अभियानात केला जाणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना