शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

माेताळा तालुक्यात सहा पथके स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST

कर्जवसुली थांबविण्याची मागणी बुलडाणा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे, मोठे व्यवसाय बंद ...

कर्जवसुली थांबविण्याची मागणी

बुलडाणा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे छोटे, मोठे व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिक, शेतकरी व हातावर पोट असणारे मजुरदार हे आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांनी बॅंक, खासगी फायनान्सकडून घेतलेले कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे कर्ज वसुली थांबविण्याची मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.

कालव्यांवरील झुडुपे ताेडण्याची मागणी

बुलडाणा : चिखली येथून जवळच असलेल्या मिसाळवाडी लघू प्रकल्पाच्या कालव्यावर झाडे, झुडपे वाढल्याने ते फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरील झाडे ताेडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर पडा : देशमुख

लाेणार : काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे. विनाकारण बाहेर पडल्यास कारवाई करण्याचा इशारा लाेणारचे ठाणेदार देशमुख यांनी दिला आहे.

बुलडाणा शहरात ५५ पाॅझिटिव्ह

बुलडाणा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच शनिवारी ५५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच तालुक्यातील नांद्राकोळी ४, दहीद २, धाड ३, चौथा ११, वरवंड ५, सिंदखेड ११, रायपूर ७, म्हसला ३, कुंबेफळ येथील दाेघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

भादाेला येथील महिलेचा मृत्यू

बुलडाणा : शहरासह ग्रामीण भागात काेराेना संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुलडाणा तालुक्यातील भादाेला येथील ६० वर्षीय महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नांदुऱ्यात काेराेनाचा उद्रेक

बुलडाणा : नांदुरा शहर आणि तालुक्यात शनिवारी काेराेनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १८७ रुग्ण नांदुरा तालुक्यात आढळले आहेत. नांदुरा शहरात ५९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील महाळुंगी १२, निमगांव १४, टाकरखेड येथील ७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

नांद्रा काेळी परिसरात चाेरट्याचा हैदाेस

बुलडाणा : तालुक्यातील नांद्रा काेळी परिसरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. दाेन दिवसांपूर्वीच चाेरट्यांनी पाच लाखांचा ऐवज लंपास केला हाेता़. या चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

उमाळ्यात ९० पेक्षा जास्त पाॅझिटिव्ह

बुलडाणा : तालुक्यातील उमाळा येथे गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरू असून, ६०० लाेकसंख्या असलेल्या ९० पेक्षा जास्त जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.