शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

इंजिन चालले..कपबशी रिकामीच!

By admin | Updated: October 22, 2014 00:00 IST

प्रादेशिक पक्षांसमोरचे आव्हान वाढले : युती व आघाडी तुटल्याने मनसे, भारिप बमसं अडकले तिरंगी लढतीत.

राजेश शेगोकार / बुलडाणायुती आणि आघाडी तुटल्यामुळे सर्वच मतदार संघात चौरंगी लढती झाल्या. अशावेळी मनसे आणि भारिप बमसं या पक्षांसमोरचे आव्हान सर्वात मोठे होते. भारिप बमसंला असलेला सोशल इंजिनिअरिंगचा बेस मनसेपेक्षा कितीतरी अधिक मोठा होता. मात्र तरीही भारिपचे सामाजिक सुत्र अपयशी ठरले. मनसेने संपूर्ण जिल्ह्यात संघटनेची नव्याने उभारणी करून गावागावात शाखा सुरू केल्या. गाव तिथे संघटना हे सूत्र राबवत असतांना प्रत्येक बुथवर कार्यकर्ता निवडला मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला संघटना व स्वत:च्या भरवश्यावरच निवडणूकीचा प्रचार करावा लागला. एकही राज्यस्तरीय नेता मनसेच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आला नाही. त्यामुळे वातावरण निमिर्ती झाली नाही. त्याचाही फटका काही प्रमाणात बसला. महाराष्ट्राचे राहू द्या, पक्षातच नवनिर्माणाची गरजमहाराष्ट्र नवनिर्माण सेना असे नाव घेऊन राज्याच्या कानाकोपर्‍यात हो ! हे शक्य आहे असे ठामपणे सांगत प्रचार करणारी मनसे निकालानंतर जवळपास संपल्यागत जमा आहे. गेल्या वेळी राज्यात १३ जागा जिंकणारा हा पक्ष आता एका जागेवर येऊन ठेपला असुन बुलडाण्यातील निकालांनी मनसेला मनापासुन चिंतन करण्याच्या स्थितीत आणून ठेवले आहे. बुलडाणा, जळगाव जामोद व सिंदखेडराजा या तीन मतदारसंघात तिन जिल्हाप्रमुख उभे होते मात्र चिखली व जळगाव पेक्षाही बुलडाणा व सिंदखेडराजा हे दोनच मतदारसंघ मनसेच्या दृष्टीने महत्वाचे होते. विनोद वाघ नावाच्या तरूणाने सिंदखेडराजामध्ये डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या साम्राज्याला आव्हान दिले. निवडणुकीत वाघ यांनी निर्माण केलेली हवा राजकीय विेषकांनाही लक्ष वेधण्यास भाग पाडणारी होती मात्र त्यांचे इंजिन अवघ्या २४ हजार ८३३ मतांवर विसावले. बुलडाण्यात संजय गायकवाड यांनी प्रचाराची स्टाईल एकदम बदलवून टाकत त्यांनी सामान्यांच्या भावनांना हात घातला. पराभव होऊनही मनसेने येथे घेतलेली मते ही सन्मानजनकच आहेत. जळगावात मात्र तिसरे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांना करीष्मा करता आला नाही. केवळ २३२७ मते घेऊन ते थांबले व चिखलीत विनोद खरपास यांनी ३१0३ मते घेतली.अकोला पॅटर्न बुलडाण्यात रूजेना.अकोला पॅटर्न या नावाने सोशल इंजिनिअरींग सुरू करून अँड.प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात लक्ष वेधुन घेतले. मात्र दुदैवाने हा पॅटर्न आतापर्यंत अकोल्याच्या पलीकडे सरकला नाही. सायकल, उगवता सुर्य अशा निशाण्या बदलत अखेर ह्यकपबशीह्ण हे चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेल्या भारीप-बमसंला बुलडाण्यात मात्र संधी असुनही कपबशी भरता आली नाही. त्यामुळे आता या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.अकोला, बुलडाणा व वाशीम या तिन्ही जिल्ह्यातील भारीप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रिंगणात उ तरले होते. त्यापैकी अकोल्यात बाळापूरमधून बळीराम सिरस्कार हे एकमेव आमदार झाले आहेत. वाशिमसह बुलडाण्यातील प्रकाश गवई व खामगावात अशोक सोनोने हे सुद्धा पराभूत झाले. बुलडाण्यात सात उमेदवार उभे असले तरी खरी लढाई ही खामगाव व जळगाव जामोद मध्येच होती. जळगावात गेल्यावेळी हुकलेला विजय यावेळी हमखास मिळेल, अशी संधी होती मात्र यावेळी पुन्हा एकदा गणित कोलमडले व प्रसेनजित पाटील यांना पराभव पत्करावा लागला.