शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीने केली १८ कोटींची वसुली

By admin | Updated: May 22, 2014 23:41 IST

खामगांव उपविभागीय कार्यालय अंतर्गत ५ तालुक्यात वीज वितरण कंपनीने १८ कोटी ४0 लाख ५१ हजार रुपयांची देयक वसुली केली आहे.

खामगाव : शहर भारनियमनमुक्त होण्यासाठी महावितरण कंपनी कडून मार्च महिन्यापासून वसुली काटेकोरपणे सुरु आहे. त्यामुळेच खामगांव उपविभागीय कार्यालय अंतर्गत ५ तालुक्यात वीज वितरण कंपनीने १८ कोटी ४0 लाख ५१ हजार रुपयांची देयक वसुली केली आहे. यामध्ये खामगाव शहरातील गत तीन महिन्यातील वसुली ६ कोटी २0 लाख ३९ हजार रुपये आहे. या वसुलीमुळेच खामगाव शहर ह्यअह्ण दर्जाचे राहत असल्याने भारनियमनमुक्त आहे. खामगांव उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयद्वारा मार्च २0१४ पासून वीज देयकाची नियमित वसुली व्हावी यासाठी मोहीम राबविल्या जात आहे. या मोहिमे अंतर्गत ध्वनीक्षेपक ावरुन देयक भरण्यासाठी आवाहन करणे तसेच कर्मचार्‍यांकडून घरोघरी जावून नियमित वीज देयक भरण्याबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. सदरची मोहीम उपविभागीय कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, शहर अभियंता गणेश एकडे. यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये नियमित देयक भरण्याबाबत जागृती होत असून यामुळे खामगाव शहराचा दर्जा न घसरता ह्यअह्णवर्ग कायम आहे. यामुळे खामगाव शहर भारनियमनमुक्त राहत आहे. खामगाव शहरातून ६ कोटी २0 लाख ३९ हजाराची वसुली वीज वितरण कंपनीकडून खामगांव शहरात गत मार्च महिन्यात २ कोटी ६२ लाख ७५ हजार रूपये, एप्रिल महिन्यात २ कोटी ७ लाख ५७ हजार रुपये तर मे महिन्यात १ कोटी ५0 लाख ७ हजार रूपये वसुली करण्यात आली आहे. तर खामगाव ग्रामीणमधून मार्च महिन्यात १ कोटी २४ लाख ७२ हजार, एप्रिल महिन्यात ६८ लाख ३८ हजार रूपये, मे महिन्यात ६0 लाख ७३ हजार रूपये, अशी खामगाव तालुक्यातून एकूण ८ कोटी ७४ लाख २२ हजार रूपयांची वसुली वीज देयकापोटी करण्यात आली आहे. तर वीज वितरण कंपनीच्या मेहकर कार्यालय अंतर्गत मार्च महिन्यात २ कोटी २0 लाख २९ हजाराची वसुली झाली. एप्रिल महिन्यात ७१ लाख १ हजार, मे महिन्यात ७४ लाख ८९ हजार रूपये वसुली झाली. लोणार कार्यालय अंतर्गत मार्च महिन्यात ८४ लाख ८ हजार रूपये, एप्रिल महिन्यात ३0 लाख २९ हजार तर मे महिन्यात २६ लाख ५१ हजार रूपये देयकापोटी वसुली झाली. शेगांव कार्यालय अंतर्गत महावितरण कंपनीने मार्च महिन्यात १ कोटी १६ लाख २५ हजार रूपये एप्रिल महिन्यात १ कोटी २२ लाख तर मे महिन्यात ९३ लाख ७ हजार रूपये वसुली झाली. संग्रामपूर वीज वितरण कार्यालय अंतर्गत येणार्‍या गावांमधून मार्च महिन्यात ८१ लाख ९९ हजार रूपये एप्रिल ३३ लाख तर मे महिन्यात ३४ लाख ६९ हजार रूपये वसुली करण्यात आली. खामगांव कार्यालय अंतर्गत येणार्‍या ५ तालुक्यातून सर्वात जास्त वसुली खामगांव तालुक्यात सर्वात कमी लोणार तालुक्यात झाली. महावितरण कंपनीद्वारा नियमित झालेल्या या वसुलीमुळे खामगांव शहर उन्हाळ्याच्या दिवसाम भारनियमनमुक्त राहिले त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळाली. ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा- अशोक म्हस्के नागरिकांकडून देयक भरण्यासाठी महावितरण कंपनी कार्यालयास प्राथमिकता देण्यात येते. मात्र या ठिकाणी लांबलचक रांग लागत असल्याने ग्राहकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे महावितरणकडून ऑनलाईन देयक भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. महा ई सेवा केंद्रावरही देयक भरता येते. त्यामुळे या सेवांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी केले आहे.