शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

लसींचा स्टॉक नसल्याने आठ केंद्रे प्रभावित; पुढे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:34 IST

Corona Vaccine : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर राज्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना उद्रेक वाढता असतानाच, लसींचा तुटवडा जाणवत आहे. रविवारी खामगाव तालुक्यात लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण प्रभावित झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत तालुक्यातील नऊ केंद्रांवर रखडले होते. मात्र, दुपारी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात ५०० लसीचा पुरवठा झाला. त्यानंतर येथील लसीकरण सुरळीत झाले. राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर राज्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर, १ मार्चपासून दुर्धर आजार व ४५ ते ५९ वयोगटातील  नागरिक,  ६० वर्षांवरील सर्व वृद्ध आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी जिल्ह्यात खासगी १६  ठिकाणी, तर ९८ शासकीय ठिकाणी लसीकरण केले जात आहे. कोरोना लसीकरणाचे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच गावागावांत कोविड-१९ लसीकरण शिबिर घेतले जात आहे.

तालुक्यात नऊ ठिकाणी लसीकरणखामगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खामगाव येथील नागरी आरोग्य केंद्रासह दोन खासगी रुग्णालये आणि उपजिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. दरम्यान, रविवारी सर्वच ठिकाणी लसींचा साठा संपला होता. त्यामुळे येथील लसीकरण प्रभावित झाले होते. सोमवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत झाले.

खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी दुपारी ५०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. रविवारी लसीचा साठा संपला होता. त्यामुळे रविवारी लसीकरण मोहीम बंद होती. -डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी,  खामगाव. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगाव