शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त

By admin | Updated: October 25, 2014 23:28 IST

आर्थिक व्यवहारावर झाले विपरीत परिणाम.

खामगाव (बुलडाणा) : ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा नोकरशहांसाठी पर्वणी ठरला. सलग पाच दिवस आलेल्या सुट्यांमुळे अनेकांनी पिकनिकची मौज घेता येणार आहे. काही नोकरशहांनी आपली वैयक्तिक कामे मार्गी लावण्यासाठी या सुटीचा उपयोग घेतला आहे.ऑक्टोबर महिना म्हटला, की सणासुदीची रेलचेल. दसरा, दिवाळी, बकरी ईद, नवरात्रोत्सव आदी महत्त्वाचे उत्सव याच महिन्यात येतात. त्यामुळे नोकरशहांसाठी सुट्यांची मौज उ पभोगण्याची पर्वणी याच महिन्यात असते. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. उलट दरवर्षी पेक्षा यंदा सणांच्या सुट्या सलग आल्या आहेत. २३ तारखेची दिवाळी होती. त्यामुळे शासकीय कार्यालयांना सुटी होती. २४ तारखेलाही बलिप्रतिपदेची सुटी असल्यामुळे कार्यालये बंद होती. २५ तारखेला चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी राहिली. योगायोग म्हणजे याच दिवशी भाऊबीज आल्याने नोकरशहांचा आनंद द्विगुणित झाला. उद्या २६ ऑक्टोबरला रविवार आहे. नोकरशहांना सलग पाच दिवस सुटी मिळाली आहे. नेमक्या याच दिवसांत शाळांनाही सुट्या असल्यामुळे बर्‍याच नोकरशहांनी आपल्या कुटुंबासोबत सहलीचा बेत पूर्ण केला. सलगच्या सुट्यांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार पार ठप्प झाले आहेत. बँकाना चार दिवसांची आलेली सुटी, शिवाय दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झालेली उलाढाल यामुळे बहुतांश बँकाच्या एटीएममधील पैसे संपले आहेत. एटीएममधील ठणठणाटांचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागला, हे विशेष.शासकीय कामांचा होणार खेळखडांबादिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्यांमुळे शासकीय कामकाजाचा पार खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येलादेखील अनेक कार्यालयातील कर्मचार्‍यांनी सुटी टाकली होती. अशाप्रकारे सहा दिवस शासकीय कामकाज बंद राहणार असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. गत महिनाभरापासून निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले होते. सर्व अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. आता सलग सुट्यांमध्ये पुन्हा कामकाज बंद पडले.