शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

डायरियाचे थैमान; ८0 रुग्णांवर उपचार सुरू

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

धाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये डायरियाचे ८0 रुग्ण भरती; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन

धाड : गेल्या तीन दिवसांपासून डायरियाने धाडवासीयांना हैराण केले असून, आजही येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची रीघ कायम होती. गत दोन दिवसात निर्माण झालेल्या परिस्थितीने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने गावात ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले. यात सर्व नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले.
आज दुपारपर्यंत येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ८0 रुग्ण भरती होते तर बहुतांश प्रमाणात रुग्णांना औषधोपचार करण्यात आले होते. एकंदरीत आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे आढळून आले. आरोग्य विभागामार्फत गावातील विविध भागातून गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती मिळाली आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींचे पाणी नमुने घेऊन ते तपासणीस रवाना केल्याची माहिती आहे. या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १९ जून रोजी आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांनी ६ रुग्णांचे स्टुल सॅम्पल (विष्ठा नमुने) घेऊन ते प्रयोगशाळेस तपासणीस पाठवले असता पैकी ३ रुग्णांचे नमुना तपासणी अंती तो ह्यकॉलराह्ण असल्याची माहिती याठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे गुप्त चर्चेतून बाहेर आले; परंतु कोणीही याबाबत जाहीरपणे सांगण्यास नकार दिल्याने ही फक्त चर्चाच राहिली. तर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.साबीर खान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णांचे स्टुल सॅम्पल नमुने हे तपासणीस पाठवले असून, माझ्यापर्यंत त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे तो कॉलरा आहे किंवा आणखी काय, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. याबाबत आरोग्य विभागाने त्या नमुन्यांचा अहवाल लवकर जाहीर करुन आरोग्य प्रशासनाच्यावतीने नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.