शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुर्‍याचे भांडण; सख्ख्या भावाचा खून

By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST

शेतातील बांध फोडल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात लहान भावाने मोठय़ा भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली.

देऊळगावराजा : शेतातील बांध फोडल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात लहान भावाने मोठय़ा भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली. बायगाव खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान ही घटना घडली. बायगाव खुर्द गावातील शेषराव रामराव जायभाये वय ४0 आणि केशवराव रामराव जायभाये वय ३५ या दोन सख्ख्या भावाची शेती शेजारी आहे. शेषराव यांनी त्यांच्या वाटणीत नांगरणीचे काम पूर्ण केले. वाटणीचा बांध फोडल्याने केशवराव संतापला होता. गुरुवारी सकाळी केशवराव याने गावचे पोलिस पाटील रामदास नागरे व तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर काकड यांना ही बाब सांगून शेतात चला, अशी विनंती केली. त्यानुसार हे सर्वजण शेतात गेले. शेषराव त्यांची पत्नी वंदना व मुलगा कारभारी हे सुध्दा शेतात हजर होते. बांध फोडला की नाही, याची पाहणी पो.पा.नागरे व मधुकर काकड करत असताना आरोपी केशवराव याने शेषरावची पत्नी वंदावर चाकूने हल्ला चढवला; मात्र तीने प्रतिकार केला. त्याचवेळी शेषरावचा मुलगा याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केशवरावने केला. हे बघून शेषराव धाऊन गेले; मात्र केशवराव याने शेषरावच्या पोटात चाकू खुपसला आणि चाकू पुन्हा बाहेर काढून वहिनी वंदनावर हल्ला केला. यात त्याच्या खांद्याला मार लागला. हा सगळा प्रकार अनपेक्षितपणे घडल्याने सारेच धास्तावले होते; मात्र प्रसंगावधान ठेवत रामदास नागरे व मधुकर काकड यांनी आरोपी केशवरावला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. पोटात चाकू खुपसून वर्मीघाव झाल्याने शेषराव जायभाये यांना रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देऊळगावमही ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने जालना येथे पाठवले. तिथे डॉक्टरांनी तपासून शेषराव जायभाये यांना मृत घोषित केले. मृतकाची पत्नी वंदना जायभाये यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांनी अंढेरा पो.स्टे.ला फिर्याद दिली. घटनास्थळावर हल्ला केल्यानंतर आरोपी केशवराव जायभाये सरळ अंढेरा पो.स्टे.ला हजर झाला. पोलिसांनी लगेच त्याला अटक करुन कोठडीत डांबले. जालना येथे पोस्टमार्टम झाल्यानंतर आज सायंकाळी बायगाव खुर्द येथे मृतक शेषराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास अंढेरा पोलिस करीत आहेत.