शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

१५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Updated: May 16, 2014 23:03 IST

बुलडाणा लोकसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

बुलडाणा : अपेक्षित मते न पडल्यामुळे रिंगणात असलेल्या १७ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांना आपली अनामत गमवावी लागली. बुलडाणा लोकसभा मतदार संघात एकूण १७ उमेदवार रिंगणात होते. जवळपास १८ लाख १४ हजार ३७१ मतदारांपैकी ९ लाख ७१ हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. प्रत्येक उमेदवाराला आपली अनामत रक्कम राखण्यासाठी १ लाख ६३ हजार ३३ मतांची आवश्यकता होती. प्रतापराव जाधव आणि कृष्णराव इंगळे यांच्या व्यतिरिक्त एकही उमेदवार १ लाख मतांच्या आकड्यापर्यंत पोहचू शकला नाही. तिसर्‍या क्रमांकावर असलेले बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अब्दुल हाफीज अब्दुल अजीज यांना ३३,७८३ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे हे केवळ २९,७९३ एवढय़ाच आकड्यापर्यंत येऊन पोहचले. दराडे हेच तिसर्‍या क्रमांकाची मते घेतील, विजयी उमेदवाराचे गणित दराडे ठरवतील, असे अंदाज व्यक्त केल्या जात होते. तथापि, हे सारे अंदाज चुकीचे ठरले. दराडेपेक्षा अब्दुल हाफीज यांनी जास्त मते घेतली. तर मागील निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या हत्तीवर स्वार झालेले वसंतराव दांडगे हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. त्यांनाही आपली अनामत रक्कम राखता आली नाही. दांडगे यांना जेमतेम २,७५0 मते पडली. आम आदमी पक्षाचे सुधीर सुर्वे यांना केवळ ३,४२९ मते पडली.