शिवाजी विद्यालयात लोकशाहीचे धडे !

By Admin | Updated: July 20, 2015 23:14 IST2015-07-20T23:14:52+5:302015-07-20T23:14:52+5:30

चिखली तालुक्यातील शेलसूर येथे वर्ग ५ ते १२ वर्ग नायकासाठी राबविण्यात आली निवडणूक प्रक्रिया.

Democracy lessons in Shivaji school! | शिवाजी विद्यालयात लोकशाहीचे धडे !

शिवाजी विद्यालयात लोकशाहीचे धडे !

चिखली (जि. बुलडाणा): बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ वी पर्यंतच्या एकूण १४ तुकड्यांच्या वर्ग नायक निवडीसाठी चक्क निवडणुका घेण्यात आल्या. यानुषंगाने शाळेत उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर मतदान व मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. निवडणुका हा लोकशाहीचा कणा तर मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते. बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव व्हावी व लोकशाहीचे धडे मिळावेत, या हेतूने तालुक्यातील शेलसूर येथील ङ्म्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयात वर्ग ५ ते १२ पर्यंंत एकूण १४ तुकड्यांसाठी वर्गनायक (वर्गप्रमुख) निवडीसाठी शाळेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात आला. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज मागे घेणे, प्रत्यक्ष निवडणूक, मतमोजणी यासाठी नियोजन करून व वेळापत्रकाची आखणी करून गुप्त पध्दतीने मतदानाची प्रक्रीया राबविण्यात आली. शनिवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत ९७ टक्के विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान व मतमोजणीसाठी शिक्षकांच्या एका चमुचे गठण करण्यात आले होते. प्रत्यक्ष मतमोजणीअंती प्रत्येक वर्गाचा नायक व उपनायकांची निवड घोषीत करण्यात आले. 

*विद्यार्थ्यांंना लोकशाहीचे बाळकडू

   मजबूत लोकशाहीसाठी निवडणुका हा महत्त्वाचा भाग समजला जातो त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनिल देशमुख यांच्या संकल्पनेतून दरवर्षी शाळेत विद्यार्थ्यांंच्या निवडणुका घेतल्या जातात. विद्यार्थ्यांंना नागरिकशास्त्न व राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात निवडणूका व लोकशाहीसंदर्भात धडे आहेत. ते प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांंना अवगत व्हावे शिवाय गावपातळीपासून देशपातळीपर्यंंतच्या निवडणुका कशा पद्धतीने पार पडतात, याचे बाळकडू या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंना मिळत असल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Democracy lessons in Shivaji school!