शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

दाट लग्नतिथीने धावपळ

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

वैशाख मे महिन्याचे कडाक्याचे ऊन त्यातच दाट लग्नतिथीने नातेवाईक व इष्टमित्रांची लग्नघाईत मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे.

शेगाव: वैशाख मे महिन्याचे कडाक्याचे ऊन त्यातच दाट लग्नतिथीने नातेवाईक व इष्टमित्रांची लग्नघाईत मोठी धावपळ होत असल्याचे चित्र आहे. लग्नघाईत एकाच दिवसात नातेवाईक, इष्ट मित्रांची चार-पाच ठिकाणी हजेरी लावताना मोठी तारांबळ उडत आहे. नातेवाईक इष्टमित्रांचे संबंध चांगले टिकवून ठेवण्यासाठी लग्नकार्यात हजेरी लावणे आवश्यक व गरजेचे असल्याने चार-पाच ठिकाणी लग्नात हजेरी लावताना मोठी दमछाक होत आहे. त्यातच अधिकच लग्नकार्य असल्याने कोठे भेटी घेत हजेरी लावून जेवण टाळले जात आहे. त्यातच लग्नाच्या वेळेस डिजेमुळे दोन-दोन तीन-तीन तास उशिरा पुढे ढकलले जात असल्याने नियोजन कोलमडून पडत आहे. वधूकडील मंडळी व वर्‍हाडी मोठय़ा प्रमाणात येतील म्हणून स्वयंपाक जास्त करुन ठेवत आहे. उशिरा व ऊन त्यातच दुसर्‍या कार्यात जाण्याच्या कारणाने स्वयंपाक शिल्लक पडून वाया जात आहे. एकूण लग्नघाईत नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. लग्नसराई म्हणजेच आनंद, पैशांचा चुराडा व हौस यातूनच विविध रोजगार निर्माण होऊन कमाई होते. वधू पाहण्यापासून खर्चाला सुरुवात होते. ये-जासाठी वाहन, चहापाणी खर्च, मुलगी वधूच्या हाती पैसे देणे, कुंकू-टिळा लग्नापयर्ंत विविध खर्च, किराणा, वाहन, कपडेलत्ते, भांडी, फर्निचर परंतु हौस म्हणून नवरदेवाचे वाहन, सजावट करणे पूर्वी केवळ थर्माकोलचे पोस्टर लावून वर-वधूचे नाव दुल्हन हम ले जायेंगे किंवा हे बंध रेशमाचे लावल्या जायचे. परंतु यात मोठे बदल झाले असून पोस्टरबरोबरच चमकी, फुले, बुके, विविध सजावट करण्यात येत आहे. तर लग्नकार्यासाठी डोलीबाजा किंवा डिजे हमखास लावण्यात येते. त्याशिवाय लग्नकार्य पार पडणे अशक्य आहे. सध्या लग्नसराईचा हंगामच सुरू आहे. यात व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. या लग्न कार्यातून अनेक व्यवसाय फुलले आहेत. मात्र दिवसाला दोन-तीन लग्न येत असल्याने हजेरी लावताना चांगलीच धावपळ होत आहे. तर दाट लग्नसराईमुळे बसेसवर गर्दी राहत आहे. तर प्रासंगिक करारामुळे बसेस सुध्दा कमी आहेत.