शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

CoronaVirus in Buldhana : बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी ‘अल्टिमेटम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:59 AM

खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून बाहेरगावहून आलेल्यांची तपासणी तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिलेत. खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र, रोजगारासाठी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, अहमदनगर यासारख्या महानगरात तर गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि सूरत येथील सुमारे २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी जिल्ह्यात प्रवास केला. खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये तब्बल साडेतीन हजारापेक्षा जास्त नागरिक बाहेरगावहून दाखल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी अनेकांनी आपल्या दुचाकी आणि खासगी वाहनांचा वापर केला. बाहेरगावहून आलेल्यांची पंचायत समिती प्रशासनाकडून माहिती संकलित केल्या जात आहे. सोबतच पंचायत समितीकडून आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी त्यांचा अद्ययावत डाटा दिला जात आहे. दरम्यान, खात्रीलायक माहितीनुसार खामगाव तालुक्यातील सुमारे एक हजार आणि जिल्ह्यातील ९ हजार नागरिकांची तपासणी अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस