शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Deaths : बुलडाणा जिल्ह्यात दर दहा तासाला एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:16 IST

Corona in Buldhana District : साधारणत: दहा तासाला एक मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही आता वाढले आहे. गेल्या सहा दिवसात कोरोनाचे १५ बळी गेले आहेत. त्यानुसार साधारणत: दहा तासाला एक मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.जिल्ह्यात कोरोना महामारीला २८ मार्च रोजी वर्षपूर्ती झाली. पश्चिम वऱ्हाडातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू हा बुलडाण्यातील होता. त्यामुळे सुरुवातीला कोरोनाची एक भीती प्रत्येकामध्ये निर्माण झाली होती. परिणामी प्रत्येकजण मास्क वापरणे, गर्दीच्या टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात होते. मात्र हळूहळू यात बदल होत गेले. दरम्यान, कोरोनावर लस आल्यापासून अनेक नागरिक अधिकच बिनधास्त झाले. मास्क न वापरणे, नियमांचे उल्लंघन करणे यामुळे कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोजचा एक नवा उच्चांक गाठत आहे. परंतु त्याहीपेक्षा चिंताजनक बाब ही कोरोनाने होणारे मृत्यू आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना मृत्यू होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. आतापर्यंत पॉझिटिव्हिटीचा दरच जास्त होता, मात्र आता जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा दरही वाढला आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये १५ मृत्यू झाले आहेत. प्रत्येक दिवशी आता दोन ते तीन मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गंभीर स्थिती ओळखून प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

या ठिकाणी झाले मृत्यूगेल्या सहा दिवसांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील अमोना, अमडापूर, खामगाव शहर, खामगाव तालुक्यातील गणेशपूर, मलकापूरमधील विष्णूवाडी, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा, वाशिम, नांदुरा, पुंडलीकनगर चिखली, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सर्दी, खोकला झाला तर अंगावर काढून नका, लगेच तपासणी करून घ्या. प्राथमिक अवस्थेतच उपचार झाले तर मृत्यू ओढावू शकणार नाही. मृत्यूचे प्रमाण हे वृद्धांमध्ये जास्त असल्याने ६० वर्षांवरील व्यक्तींची काळजी घ्या. लसीकरणासाठी स्वत:हून पुढे या. प्रत्येकाने नियमांची त्रिसूत्री पाळावी. -डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा