शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारावरून खामगाव नगर पालिकेच्या सभेत वादंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:46 IST

विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले. विषयसूचीवरील पहिल्याच विषयावर गदारोळ सुरू झाल्याने सोमवारची सभा चांगलीच वादळी ठरली. तथापि, या सर्वसाधारण सभेत विविध ३० विषयांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ७ विषयांवर विरोधकांनी आपला कडाडून विरोध दर्शविला.खामगाव शहरातील विकासाला गती देण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता स्थानिक नगर पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या अनुपस्थितीत उप मुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांनी सभेचे कामकाज पाहीले. यावेळी विषय सूचीवरील मागील सर्वसाधारण सभेचे वृत्तांत कायम करण्याच्या पहिल्याच विषयाला काँग्रेस नगरसेवक प्रविण कदम यांनी आक्षेप नोंदविला. गत साडेतीन महिन्यांपासून पालिकेच्या विविध सभांमध्ये मंजूर झालेल्या ठरावाचे कार्यवृत्त विरोधी पक्षाला देण्यात आलेले नाहीत. नियमावलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नगरसेवक प्रविण कदम भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक सतीशआप्पा दुडे, ओमप्रकाश शर्मा, हिरालाल बोर्डे, आरोग्य सभापती दुर्गा हट्टेल यांनी नगरसेवक प्रविण कदम यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्षेप नोंदविला. त्याचप्रमाणे यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक खडाजंगीही उडाली. अपशब्द वापरून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी नगरसेवक कदम यांनी माफी मागावी, असा मुद्दाही यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी नगराध्यक्षांनी नगरसेवक कदम यांना ताकीद देत, प्रकरण मिटविले. त्यानंतर विषय सुचीवरील विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी सभेचे कामकाज पुढे सुरू झाले.

कलम ३७० च्या अभिनंदन ठरावास विरोध!काश्मीरमध्ये केंद्र शासनाने कलम ३७० रद्द केल्याबाबत केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी मांडला. या ठरावाला नगरसेवक सतीशआप्पा दुडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला काँग्रेस नगरसेवकांनी विरोध दर्शविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी तटस्थता दर्शविली. सभागृहात भारिप नगरसेवक विजय वानखडे अनुपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा