शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसची पदयात्रा

By admin | Updated: August 14, 2015 23:36 IST

खामगाव ते पिंपळगावराजा १८ किलोमीटर पदयात्रेत साधला जनसंवाद.

खामगाव : माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी १८ कि.मी. खामगाव ते पिंपळगावराजा काँग्रेस संदेश पदयात्रेचा शुभारंभ श्री स्वामी सर्मथ आध्यात्मिक केंद्र येथून करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, बुलडाण्याचे आ.हर्षवर्धन सपकाळ, खामगावचे माजी आ. दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहप्रभारी ऋत्विक जोशी, बुलडाणा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष डॉ.तबस्सुम हुसेन, युवक काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा निरीक्षक सागर देशमुख, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, माजी जि.प. अध्यक्ष वर्षा वनारे आदी सहभागी झाले होते. यात्रेच्या प्रारंभी बोलताना माजी आ.सानंदा म्हणाले की, नरेंद्र, देवेंद्रचे भाजप सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकर्‍यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस लढा देणार, अशी ग्वाही दिली. शेतकरी नैसर्गिक संकटांनी हतबल झालेला असताना या संवेदनाहिन सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी ऋत्विक जोशी यांनी केली. जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार हे अपयशी सरकार ठरले आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुष्काळाचे सावट असताना शेतकर्‍यांना मदत करण्याची भूमिका शासन घेत नसल्याबाबत त्यांनी आरोप केला, तर आ.सपकाळ यांनी कुठे गेले अच्छे दिन, असा प्रश्न उपस्थित करून शेतकर्‍यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.