शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:48 IST

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्देराज्य व केंद्र शासनाचा निषेध : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी ब्रह्मपुरीत काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिकांचा सहभाग होता.
घंटनाद आंदोलनाचे नेतृत्व आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गरीब शेतकरी व सामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन महागाईच्या खाईत टाकले आहे. काँग्रेस सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढ करताना ४० वर्ष लागले. तर सध्याच्या सरकारने ४० महिन्यात दर दुप्पट करून जनतेची लूट केल्याचा आरोप घंटनाद आंदोलनात आ. वडेट्टीवार यांनी केला.
शेतकºयांची कर्जमाफी केवळ पोकळ आश्वासन असून आॅनलाईनच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे घंटनांद आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सकाळी शिवाजी चौकात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जमा होऊन घंटानादचा गजर करीत होते. शिवाजी चौकात या घंटानांद आंदोलनाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर तहसिलदार विद्यासागर चव्हान यांनी स्वत: येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक निर्वाचन प्रभारी रामगोपाल भवनिया, तालुकाध्यक्ष खोमराज तिडके, शहराध्यक्ष बाळू राऊत, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, नितीन उराडे, प्रा. सुभाष बजाज, विलास विखार, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, थानेश्वर कायरकर, प्रतिभा फुलझेले, रोहित एरगेल्लवार, नलिनी सावरकर, सुचित्रा ठाकरे, मोटघरे, पेशने, लोनबले, ठाकूर, अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.