शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानासाठी

By admin | Updated: November 20, 2015 00:41 IST

तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे .....

पंचायत समितीचा अभिनव उपक्रमपोंभुर्णा : तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिपावलीच्या पर्वावर १२ हजार शुभेच्छा कार्ड आणि १६२ पोष्टर काढून प्रत्येक गावामध्ये जनजागृती निर्माण केली. प्रत्येकांना घरी शौचालय बांधण्याचा व शौचालय बांधून वापर करीत असलेल्या व्यक्तीचा शुभ संदेशातून अभिनंदन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. तालुक्यामध्ये सन २०१५-१६ साठी ६८७ शौचालयासाठी ८४ लाखाचा निधी प्राप्त झाला असून तालुक्यातील जास्तीत जास्त व्यक्तींकडे शौचालय व्हावे आणि शौचालय बांधलेल्या व्यक्तींनी त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे हे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संदेश देणारे शुभेच्छा पत्रक वाटले. आणि बॅनर्स गावागावामध्ये लावून संपूर्ण तालुका परिसरामध्ये जनजागृती करण्याचे अभिनव राबविला. त्यांना या कामात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत मिळत आहे. कामामध्ये अतिशय वक्तशिरपणा व आपल्या कार्यात तत्पर असणारे लोकरे यांनी कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या जवळपास १० कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली. संपूर्ण पोंभुर्णा तालुका मार्च महिन्या अखेर शंभर टक्के हागणदारी मुक्त करणार असून राज्यामध्ये फक्त सात पंचायत समिती हागणदारीमुक्त असून जिल्ह्यात एकही पं.स. समिती हागणदारी मुक्त नाही. त्यामुळे पोंभुर्णा पं.स. समिती जिल्ह्यात हागणदारीमुक्त करण्याचे आपले स्वप्न असून राज्यामध्ये सुद्धा पोंभुर्णा पंचायत समितीचे नाव लौकीक करण्याचा आपला मानस असून यासाठी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाधिकाऱ्यांना भेटून तालुका परिसर शंभर टक्के मार्च अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)