शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST

नोकरीचे आमिष दाखवून जवळपास ५ लाखाची रक्कम घेवून एका महिलेसह चौघांनी खामगावातून पोबारा केला आहे.

खामगाव : सेक्युरिटी जॉब प्लेसमेंट ऑफीस अकोला येथून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी १0 ते २0 हजार जमा करुन जवळपास ५ लाखाची रक्कम घेवून एका महिलेसह चौघांनी खामगावातून पोबारा केला आहे. या प्रकरणी राजेश रमेश गवळी याचेसह इतर ३२ तरुणांनी स्थानिक शहर पोलिस स्टेशनला फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. स्थानिक धोबी खदान भागातील संतोष एकनाथ गुळभेले, सौ.रुपाली संतोष गुळभेले, एकनाथ गुळभेले व दिनकर देवचे रा.जलंब या चौघांनी संगनमत करुन खामगाव व तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संतोष गुळभेले हा खामगावात सेक्युरिटी गार्ड म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र येथे कार्यरत होता. यावेळी त्याचेशी आपली ओळख झाल्याचे राजेश गवळी याने तक्रारीत म्हटले आहे. ओळख झाल्यानंतर संतोष गुळभेले याने अकोला येथील जॉब प्लेसमेंटमधून सेक्युरिटी गार्ड पदाच्या नोकरी निघाल्या आहेत. त्याचे अर्ज भरणे सुरु असून दरमहा ११ हजार ४00 रुपये पगार आहे. त्याकरिता साहेबांना प्रतिव्यक्ती २0 हजार रुपये द्यावे लागतात असे सांगितले. उपरोक्त चौघां.ऩी मिळून खामगाव व परिसरातील ३३ तरुणांकडून जवळपास ५ लाख रुपये घेतले मात्र नोकरी लावून दिली नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे. सदरची तक्रार शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली असून ही तक्रार पोलिसांनी चौकशीवर ठेवली आहे.