शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘व्होटर स्लीप’ घरोघरी पोहोचविण्याचे आयोगासमोर आव्हान!

By admin | Updated: September 28, 2014 23:16 IST

मागील लोकसभा निवडणुकीपासून राजकीय पक्षांद्वारे व्होटरस्लिपच्या वाटपास बंदी.

खामगाव (बुलडाणा) : लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांना व्होटर स्लीप च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याची संधी मिळत होती; परंतु ही संधी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाने हिरावून घेतली आहे. आता या कामाची जबाबदारी निवडणूक आयोगाने आ पल्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडे सोपविली आहे. आयोगाकडे अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी यंत्रणा लक्षात घेता अल्पावधीत व्होटर स्लीप मतदारांच्या हातात पोहचविण्याचे एक आव्हान आयोगापुढेच उभे राहिले आहे. व्होटर स्लीपच्या माध्यमातून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आणि अगदी प्रचार संपल्यानंतरही राजकीय पक्षांना मतदारांना भेटण्याची संधी मिळत होती. या कामामुळे मतदारांपर्यत शेवटचा संदेश पोहचला जात असल्याने राजकीर पक्षही खूश होते; परंतु आता निवडणूक आयोगाने यावर निर्बंध घातले आहे. लोकसभा निवडणुकीपासून आयोगाने ही संपूर्ण जबाबदारी स्वत:कडेच घेतली. प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतरही व्होटर स्लीपच्या माध्यमातून राजकीय पक्ष स्वत:चा प्रचार करीत असल्याचा आक्षेप घे त साध्या कागदावरील स्लीप वाटण्याचे काम निवडणूक आयोगाने आपल्या जिल्हा व तालुका स् तरावरील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडे सोपविले आहे; परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत अ पुर्‍या मनुष्यबळामुळे आयोगाची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहर व ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच या स्लीपचे वाटप करण्यात आले होते. याचा त्रास मतदारांनाही सोसावा लागला होता. लोकसभा निवडणुकीच्या काळातील अनुभव पाहता, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आयोगाने याबाबतच्या नियमात बदल करावा आणि मतदारांचा त्रास कमी करावा, अशी विनंती काही प्रादेशिक पक्षांनी जिल्हास्तरांवर आयोगाकडे केली होती. मात्र हा निर्णय केंद्रीयस् तरावरून घेण्यात आल्याने यात कुठलाही बदल करता येणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा याची पुनरावृत्ती होणार का ? अशा व्होटर स्लीप छा पणार्‍या उमेदवारांवर कारवाई होणार? हे येणार्‍या काळात स्पष्ट होणार आहे.