बुधवतांनी स्वीकारला सभापती पदाचा पदभार

By Admin | Updated: July 20, 2015 23:12 IST2015-07-20T23:12:19+5:302015-07-20T23:12:19+5:30

बुलडाणा बाजार समितीतील चिरीमिरी बंद करण्याची नवीन सभापतींची ग्वाही.

Chairperson of the post of Chairman | बुधवतांनी स्वीकारला सभापती पदाचा पदभार

बुधवतांनी स्वीकारला सभापती पदाचा पदभार

बुलडाणा : बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार्‍या काळात बाजार समिती तसेच उपबाजारपेठेत शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करू, येथे जास्तीत जास्त व्यापारी व्यवसाय करतील व शेतकर्‍यांना वाढीव भाव मिळवून देतील त्यामुळे यापुढे बाजार समितीमधील कथित चिरीमिरी बंद होईल अशी ग्वाही नवनिर्वाचीत सभापती जालींधर बुधवत यांनी दिली. कृऊबास सभापतीपदाचा बुधवत यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. कार्यकर्ते, राजकीय व सामाजिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बाजार समितीत असा कार्यक्रम पार पाडला.यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प. विरोधी पक्षनेते अशोक इंगळे, पं.स.उपसभापती रामेश्‍वर पाटील, सुधाकर आघाव, नवनिर्वाचित संचालक श्रीकांत उर्फ राजु पवार, अर्जुन दांडगे, प्रभाकर काळवाघे, राहुल सावळे, सिंधुताई मुठ्ठे, बबन खरे, शेषराव अंभोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.सिंधुताई खेडेकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले, तालुकाप्रमुख भोजराज पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सखाराम नरोटे, खविस अध्यक्ष नारायण पाटील सुसर, नंदुभाऊ खडके, मोहनसिंग राजपूत, शशांक पंधाडे, भालचंद्र देशमुख, राहुल सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Chairperson of the post of Chairman