शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने विश्‍वास संपादन केला - पात्रा

By admin | Updated: May 30, 2015 02:27 IST

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांची बुलडाणा येथे पत्रकार परिषद.

बुलडाणा: विकासाला केंद्रबिंदू मानून केंद्रातील मोदी सरकारने मागील एक वर्षात केलेल्या कामातून जनतेचा विश्‍वास संपादन केला, त्याबरोबरच मागील एनडीए सरकारने केलेले घोटाळे व भ्रष्टाचारातून देशाला मुक्ती मिळविण्यासाठी केलेले काम हे या सरकारची उपलब्धी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना घोटाळेबाज सरकारने देशाचे वाटोळे केल्याचा आरोपही केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा बुलडाणा येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पात्रा म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर वर्षभरात एकही घोटाळा झाला नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली, परिणामी जगात देशाची छबी उजळून निघाली. स्वातंत्र्याच्या ६0 वर्षात ६0 टक्के जनता बँक प्रणालीच्या बाहेर होती. मोदी सरकारने एका वर्षात जनधन योजनेच्या माध्यमातून १५ कोटी लोकांचे बँक खाते उघडून आर्थिक समानता निर्माण केली. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील २0 टक्के लोकांनाच विमा मिळत होता. आता ७ कोटी लोक विमा योजनेत सहभागी झाले, ही अच्छे दिनची सुरूवात असल्याचा दावा त्यांनी केला. परदेशातील काळेधन असलेल्यांची नावे आता प्रसिद्ध होऊ लागली आहेत. लवकरच काळेधनसुद्धा परत येईल. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलणे टाळत ते म्हणाले की, पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मत व त्यांचा निर्णय हा अंतिम आहे. या विषयावर आपण अधिक बोलणार नाही. भाजप छोट्या राज्याचे सर्मथक आहे, यावर त्यांनी मात्र संमती दर्शविली. नेपाळचा भूकंप असो की काश्मीरचा महापूर असो, घटनेच्या काही तासात पीडिताना मदतीचा हात देण्याचे काम सरकारने केले. मोदी सरकारची विदेश नीती, केंद्र व राज्य सरकारातील समन्वय, मंत्री व पंतप्रधान यांच्यातील संवाद यामधून सरकारला चांगली कामे करता आली. त्यातूनच केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा विश्‍वास संपादन केल्याचा दावा पात्रा यांनी केला. पत्रकार परिषदेला आ. चैनसुख संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे, भाजप नेते योगेंद्र गोडे उपस्थित होते.