छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST2021-05-15T04:33:43+5:302021-05-15T04:33:43+5:30

यावेळी बोलताना सौरभ खेडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज हे जगातील सर्वोत्तम पुत्र, योद्धे व अभ्यासू राजे होते. अशा महापुरुषाची ...

Celebrating the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

यावेळी बोलताना सौरभ खेडेकर यांनी छत्रपती संभाजी महाराज हे जगातील सर्वोत्तम पुत्र, योद्धे व अभ्यासू राजे होते. अशा महापुरुषाची प्रेरणा मिळत राहावी, यासाठी चिखलीतील खामगाव चौफुलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली. दरम्यान जिल्हा कार्याध्यक्ष विकास खंडागळे यांनी लवकरच संभाजी ब्रिगेडच्यावतीने या चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करणार असण्याची घोषणा केली. दरम्यान श्रावण भुसारी यांची संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्याध्यक्षपदी व संजय काकडे यांची तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी चिखली विधानसभा अध्यक्ष आकाश लंबे, श्रावण भुसारी, संजय काकडे, शहराध्यक्ष अमोल देशमुख, तालुका उपाध्यक्ष भरत रिंढे, शहर सचिव अक्षय सवडतकर, कामगार आघाडी शहराध्यक्ष सागर महाशब्दे, उपाध्यक्ष धनंजय देशमुख, शुभम तांगडे, सोशल मीडिया प्रमुख महेश मापारी उपस्थित होते.

Web Title: Celebrating the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj