शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

कारची वाहनाला धडक; सात जखमी

By admin | Updated: May 17, 2014 23:01 IST

बुलडाणा-मलकापूर मार्गावर झालेल्या अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना.

मोताळा : तालुक्यातील मूर्तीवरून लग्न सोहळा आटोपून कुटुंबियांसह नांदुर्‍याकडे येणार्‍या आर्टिका गाडीला भरधाव वेगाने जाणार्‍या मारूती कारने समोरून धडक दिली. या अपघातात आर्टिकामधील सात जण जखमी झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावर मोताळय़ापासून तीन किमी अंतरावरील परडा फाट्याजवळ १६ मे रोजी सायंकाळी घडली. एम.एच.२८ व्ही ५५३१ या क्रमांकाच्या आर्टिका गाडीने मूर्ती येथून लग्न समारंभ आटोपून शिवाजीराव नारायण खाकरे वय ५९, शैलजा शिवाजीराव खाकरे वय ५५, शैलेश शिवाजीराव खाकरे वय ३५, सपना शैलेश खाकरे वय ३0, यथार्थ शैलेश खाकरे वय ४, सई शैलेश खाकरे वय २, चेतना सदाशीव दाने वय ३६ हे नांदुर्‍याकडे येत असताना मोताळा मार्गावरील डॉ. चोपडे यांच्या शेताजवळ पुण्याकडे जात असलेल्या मारूती अ‍े स्टार क्रमांक एम.एच.१४ सीएस ७६२१ च्या चालकाने समोरून जबर धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, खाकरे कुटुंबियांच्या आर्टिका गाडीने दोन पलट्या मारल्यामुळे गाडीचे समोरील व मागील दोन चाके फुटून गाडीचे मोठे नुकसान झाले व गाडीमधील बसलेले सातही जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी शैलेश खाकरे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अकोला येथे रेफर केले असल्याची माहिती आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चालकाच्या विरोधात कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.