शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवशीही बुलडोजर

By admin | Updated: December 10, 2014 00:13 IST

शेगाव शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमणमुक्त .

शेगाव (बुलडाणा) : नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शेगाव शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या दिलेल्या आदेशानंतर आज मंगळवारी दुसर्‍या दिवशीही अतिक्रमीत जागांवर नॉन स्टॉप बुलडोजर चालला. यामुळे सायंकाळपर्यंंंत शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमण मुक्त झाले आहे.शहरातील विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांवर व्यावसायिकांकडून वेळोवेळी अतिक्रमणे केल्या जातात. शेगाव नगर पालिकेने यासाठी अनेकवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्या नंतरही दुसर्‍या दिवशी स्थिती जैसे थे होत असल्याची बाब नागपूर उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने याबाबत शेगाव नगर पालिकेची कानउघाडणी करीत शहरातील रेल्वे स्थानक ते श्री ग.म. मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ पोलीस बंदोबस्तात काढण्याचे आदेश ३ डिसेंबर रोजी पारित करुन एका आठवड्यात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कालपासून येथे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली. सदर मोहीम काल राबविण्यात आल्यानंतर आज दुसर्‍या दिवशीही शहरातील उर्वरित अतिक्रमणांवर बुलडोजर चालले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते श्री ग.म.मंदिर प्रवेशद्वारपर्यंंंतचे मार्गावरील अतिक्रमण तोडण्यात आले. यामध्ये अतिक्रमण करुन असलेली पक्की बांधकाम केलेली दुकाने व घरही तोडण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने अतिरीक्त कुमक बोलाविली होती.ही मोहीम नगर पालिका, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय यांनी संयुक्तरित्या राबवून अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमिनदोस्त करण्यात आले.