शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

बुलडाणा : मलकापूर शहर भाजपा अध्यक्षास मारहाण; परस्परविरोधी तक्रारी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:17 AM

मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १0 वाजेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्दे सुनील घाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १0 वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सुनील घाटे यांच्यासह तिघांवर मलकापूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत, तर दुसरीकडे सुनील घाटे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून भाजप शहराध्यक्ष रामभाऊ झांबरेसह सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. मलकापूरचे भाजप शहराध्यक्ष तथा सूतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष रामभाऊ झांबरे बुधवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास संताजी नगरातील त्यांच्या मालकीच्या साईराम अपार्टमेंटमध्ये जात होते. ते कार पार्क करून घरात जाण्यासाठी निघाले असता, मोताळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील घाटे रा.मोताळा, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल तिथे पोहोचले व त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरुन वाद झाला. पाहता पाहता त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. सुरुवातीस झांबरे यांना लोखंडी पाइपाचे वार करण्यात आले. त्यानंतर दोघांपैकी एकाने झांबरे यांना पकडले व उर्वरितांनी जबर मारहाण केली. लाथाबुक्क्याही मारण्यात आल्या, अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली.  डोक्यात पाइपचा वार झाल्याने व उजव्या हातावर व पायावर मारहाण झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत रामभाऊ झांबरे व त्यांचा चालक अजय सुरपाटणे या दोघांना  स्थानीय मानस हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. डॉ.मनोज पाटील यांनी त्यांच्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत उपचार केले. सध्याही दोघे भरती आहेत. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अजय जगतराव सुरपाटणे (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून सुनील घाटे, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल या तीन जणांविरुद्ध अपराध नं.२७/१८ कलम ३२३, ३२४, ५0४, ५0६, ३४ अन्वये भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी झायलो कारच्यादेखील काचा फोडण्यात आल्या असून, सुमारे ३५ हजाराचे नुकसान करण्यात आले आहे. तपास पोहेकॉं गजानन पाटील करीत आहेत. याप्रकरणी मलकापूर व मोताळा येथील राजकीय वातावरण तापले आहे. मलकापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

घाटेंच्या पत्नीचीही तक्रार, झांबरे विरोधातही गुन्हाबिल्डींग कामावरील लोक अश्लील चाळे करतात. त्यांना पकडणार्‍या माझ्या नवर्‍यास रामभाऊ झांबरे व इतर पाच व्यक्तींनी मारहाण केल्याची तक्रार सुनील घाटे यांच्या पत्नीने दिली आहे. यावरुन शहर पोलिसांनी भाजपा शहराध्यक्ष रामभाऊ झांबरेसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. संताजी नगरात त्यांच्या घराशेजारी रामभाऊ झांबरे यांच्या बिल्डींगचे काम सुरु आहे. त्यावर काम करणारी माणसे पती घरी नसताना अश्लील गाणे गातात व चाळे करतात. त्यांना सुनील घाटे यांनी ९.३0 वाजता पकडले. त्यावरून चिडून जावून रामभाऊ झांबरे, वाहनचालक अजय सुरपाटणे आदींनी त्यांचे पती सुनील घाटे यांना मारहाण केली. घाटे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भाजपा शहराध्यक्ष रामभाऊ झांबरे, वाहनचालक अजय सुरपाटणे यांच्यासह सहा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाBJPभाजपा