शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षेत उर्दू भाषेचा समावेश करण्याची भाजप अल्पसंख्याक मोर्चाची मागणी

By admin | Updated: January 3, 2017 17:42 IST

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट ही परीक्षा २०१७ पासून इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. 3 - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट ही परीक्षा २०१७ पासून इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे. परंतु,  नीट परीक्षेत उर्दु भाषेचा समावेश नसल्याने राज्यभरातील उर्दू कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे नीट परीक्षेत इतर भाषांबरोबर उर्दू भाषेचाही समावेशकरण्याची मागणी भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यासह शिक्षणमंत्र्याकडे करण्यात आली आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  घेण्यात येणारी नॅशनल इलिजिबिलिटी ककम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट ही परीक्षा २०१७ पासून  इंग्रजीसह अन्य प्रदेशिक भाषांमध्ये देता येणार आहे. यामध्ये केंद्राकडून इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलगू या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये उर्दू भाषेचा समावेश नाही. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण ठिकाणी शेकडोच्यावर उर्दू कॉलेजमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून तेही उर्दू विषयांच्या अभ्यासक्रमानुसार सुरू आहे. ऐन नीटच्या परीक्षा वेळीच उर्दू भाषेत परीक्षा झाली नाही तर उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. इंग्रजीसह मराठी भाषेत होणाऱ्या नीट परीक्षामध्ये उर्दू विषयातून अभ्यासक्रम करणारे हजारोंच्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. मुस्लिम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नीट परीक्षेमध्ये उर्दू विषयाचा समावेश करण्यात यावा व उर्दू भाषांमध्येही नीट परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पाट्री अल्पसंख्याक मोर्चा बुलडणाचे जिल्हा सरचिटणीस वसीम शेख अनवर,मो.अन्सार शे.अन्वर, मो.अशपाक शे.युनूस, मो.दानिश मो.रफिक, मो.शहनवाज मो.युनूस, आसीफ खान रशीद खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यासह शिक्षणमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.