शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

आश्‍वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे

By admin | Updated: July 23, 2014 00:07 IST

गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते.

धाड : येथील उर्दू माध्यमिक शाळेस गेल्या ५ वर्षापासून पुरेसे शिक्षक नसल्याकारणाने शालेय शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते. पालकांच्या या आंदोलनाची दखल घेत १९ जुलै रोजी दुपारी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, गटशिक्षणाधिकारी डी.बी.तेजनकर, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.बोर्डे, तसेच शिक्षण विभागाचे डी.एस.जाधव यांचे पथकाने येथील उर्दू शाळेस भेट दिली. यावेळी अधिकार्‍यांनी आंदोलनकर्ते पालक व ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्या मार्गी लावत आंदोलन मागे घेण्यात आले. स्थानिक जि.प.उर्दू हायस्कुल धाडच्या वर्ग ८,९,१0 च्या विद्यार्थ्यांना गेल्या ५ वर्षापासून हिंदी, मराठी व शा.शिक्षणास शिक्षक नसल्याने या ठिकाणी केवळ ४ शिक्षक सर्वच विषय शिकवत होते. परिणामी एका वर्गात १५0 विद्यार्थीना बसवून शिक्षण देण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.हय़ा परिस्थितीस कंटाळून व वारंवार शिक्षण विभागास विनंती करुनही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. यामध्ये वर्ग १ ते १0 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली. शेवटी या ठिकाणी शिक्षणाधिकारी वैशाली ठग व त्यांचे पथकाने जि.प.हाय.च्या समस्या व येथील कारभाराची माहिती घेऊन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी या ठिकाणी तात्काळ कायम स्वरूपी शिक्षक नेमण्याची मागणी लावून धरली. यावेळी शिक्षण विभागातील डी.एस.जाधव हय़ांनी ग्रामस्थांना माहिती दिली की शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत या ठिकाणी कायम शिक्षक देणे शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी तात्काळ तात्पुरते. २ व २ शिक्षक मराठी माध्यमाचे येथे देण्यात येऊन हा प्रश्न सध्या निकाली काढता येऊ शकतो अशी विनंती वरुन ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी रिझवान सौदागर, म.शफी, सोहिल काजी, म.शमीम, अन्नु सौदागर हय़ांचे सह असंख्य नागरिक व पालक हजर होते.