शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तेरवीचा खर्च टाळून गावासाठी दिली विंधन विहीर

By admin | Updated: July 15, 2015 00:58 IST

मलकापूर तालुक्यातील शिरढोण येथील नारखेडे परिवाराचा अभिनव पायंडा.

सुनील देशमुख / दाताळा (जि. बुलडाणा) : मलकापूर तालुक्यातील ग्राम शिराढोण येथील सरपंच संदीप नारखेडे यांनी आपल्या आईच्या तेरवीचा खर्च टाळून गावासाठी विधिंन विहिरीचा खर्च देण्याचा अभिनव पायंडा पाडला आहे. शिरढोण गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सरपंच संदीप नारखेडे हे नेहमची प्रयत्नशिल असतात त्यांच्या आई स्व.सौ.विजया नारायण नारखेडे यांचे नुकतेच २ जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी त्यांच्या मागे पती नारायण मोतीराम नारखेडे तसेच मुले प्रमोद नारखेडे, प्रदीप नारखेडे, दिलीप नारखेडे, संदीप नारखेडे (सरपंच) हे आहेत. स्व.सौ.विजया नारखेडे यांची तेरवी १४ जुलै रोजी ठरली होती. या तेरवीचा खर्च टाळून आपल्या परिवाराकडून गावासाठी विंधनविहिर खोदून देण्याचा निर्णय नारखेडे परिवाराने घेतला व ग्रामपंचायतला या साठी रोख ४१ हजार रूपये दिले. यावेळी ग्रामपंचायत सचिव एस.पी. राठोड, उपसरपंच रविंद्र पाटील तसेच किर्तनकार हभप सुरेश महाराज शिराढोणकर उपस्थित होते. याप्रसंगी हभप सुरेश महाराज यांनी समाजात अशाच सामाजिक व विधायक कामांचा इतरांनीही आदर्श घ्याव असे आवाहन केले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, प्रफुल्ल पाटील, सुमती नाफडे, प्रविण नाफडे, सिमा वराडे, मुक्ताबाई इखारे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.