खामगाव: जागतिक चिमणी दिवसानिमित्त शहरातील पर्यावरणवादी संघटनांकडून शहरात सुमारे ५ हजार पर्यावरण पूरक घरटे आणि पाणीपात्राचे वितरण करण्यात आले. सकाळी शहर पोलिस स्टेशन समोर आणि शहरातील विविध चौकात या घरट्यांचे वितरण करण्यात आले. पक्षीमित्र संजय गुरव यांच्यासोबतच, पक्षी मित्र श्रीपाद जोशी, विजय खंडागळे यांच्यासह शहरातील तरुणाई, मुक्तांगण या सामाजिक संघटनांच्यावतीने तसेच तजेंद्रसिंह चव्हाण यांच्या कॉलेज आॅफ मॅनेजमेंटकडून गेल्याकाही वर्षांपासून पक्षांसाठी घरकुल आणि पाणी पात्राचेही मोफत वितरण केल्या जात आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}