कृषी पंपाची वीज बेपत्ता

By Admin | Updated: October 25, 2014 23:37 IST2014-10-25T23:37:15+5:302014-10-25T23:37:15+5:30

लोणार तालुक्यात वीज पुरवठा खंडीत, रब्बी पिकांवर परिनाम.

Agriculture Pipes electricity missing | कृषी पंपाची वीज बेपत्ता

कृषी पंपाची वीज बेपत्ता

लोणार (बुलडाणा) : ग्रामीण भागातील वीज गत चार दिवसांपासून बंद असल्यामुळे िपकांना पाणी देण्यासाठी शेतातातील कृषी पंपही शोभेची वस्तु ठरत आहेत. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे रब्बी हंगामातील पिके घेणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धाड फिडरवरील कृषी पंपाची विद्युत गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. तर तालुक्यातीलही विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने, कृषी पंपाच्या साहाय्याने पिकास पाणी देत असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि पिकावर आलेल्या विविध रोगांमुळे सोयाबीनचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घटले. तसेच तूर, कपाशी हे िपकही पावसाअभावी सुकण्याच्या वाटेवर आहेत. नैसर्गीक संकटामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची दिवाळी यामुळे अंधारातच गेली. रब्बी हंगामाचे पिके घेण्यासाठी वेळेवर पेरणी न झाल्यास रब्बी पिकातूनही शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन येथील विद्युत पुरवठा तात्काळ सुरूळीत करावा, अशी मागणी होत आहे.

*वीज वितरण कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव

  विद्युत सुरळीत राहत नसल्याने शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिकार्‍यांना यासंदर्भात अनेकवेळा विचारण केली आहे. तेंव्हा अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना विद्युतचे काम करण्यासाठी मणुष्यबळाचा अभाव असल्याचे सांगुन टाळाटाळ केली जात आहे.

Web Title: Agriculture Pipes electricity missing