शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

एचआरसीटीसाठी रुग्णांची लूट केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:52 AM

HRCT of Covid Patient : खासगी रुग्णालये प्रत्येक कोरोना रुग्णाला सीटीस्कॅन करण्याचा आग्रह धरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना रुग्णांचे खासगी रुग्णालय सर्रास सीटी स्कॅन करत आहेत. एचआरसीटी स्कोर तपासणीच्या नावावर हजारो रुपयांची लूट रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार दर निश्चित करून दिले आहेत. या दराचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. एचआरसीटी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले होते. खासगी रुग्णालये प्रत्येक कोरोना रुग्णाला सीटीस्कॅन करण्याचा आग्रह धरत आहेत. एचआरसीटीसाठी रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेऊन  एचआरसीटीचे दर निश्चित केले आहेत.काेराेना संक्रमण वाढल्याने पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे.त्यामुळे, डाॅक्टरांनी केलेल्या सर्वच टेस्ट रुग्ण करीत असल्याचे चित्र आहे.याचाच फायदा काही सीटीस्कॅन करणारे सेंटर व रक्त तपासणी करणाऱ्या लॅब घेत असल्याचे चित्र आहे. दर निश्चित झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

या कायद्यानुसार कारवाई  एचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, मेस्मा ॲक्ट २०११, द मुंबई नर्सिंग होम ॲक्ट २००६, अ बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक  कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सीटीस्कॅन मशीनद्वारे तपासणी केली आहे. हे नमूद करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय ही तपासणी करू नये. एचआरसीटी-चेस्ट तपासणी अहवाल रेडिओलॉजिस्टने देणे आवश्यक राहील. तपासणीसाठी निश्चित केलेले दर खासगी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटरच्या बाहेर दर्शनीभागात लावण्यात यावेत. हे दर साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत राहतील.   

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस